Nagpur Accident: नागपुरातही ड्रंक अँड ड्राईव्ह! आई- वडिलांसह ३ महिन्याच्या चिमुकल्याला उडवलं

310
Nagpur Accident: नागपुरातही ड्रंक अँड ड्राईव्ह! आई- वडिलांसह ३ महिन्याच्या चिमुकल्याला उडवलं
Nagpur Accident: नागपुरातही ड्रंक अँड ड्राईव्ह! आई- वडिलांसह ३ महिन्याच्या चिमुकल्याला उडवलं

पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये झालेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह अपघातानंतर नागपूर शहरातील ड्रंक अँड ड्राईव्हची घटना (Nagpur Accident) समोर आली आहे. नागपूर शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ कारचालक तरुणाने तीन लोकांना उडवल्याची हादरवणारी घटना समोर आली आहे. दारू आणि गांजा सेवन करून बेदारकपणे वाहन चालवणाऱ्यांनी पायी जाणाऱ्या तिघांना उडवलं आहे. गाडीत दारूच्या बाटल्या सापडल्याचं देखील समोर आलं आहे. (Nagpur Accident)

आरोपींना जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न

नागपूर (Nagpur Accident) पोलिसांनी या घटनेतील तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले त्यात एक महिला, एक पुरुष आणि ३ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या प्रकरणात आरोपींना जामीन मिळू नये यासाठी पावले उचलली आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (Nagpur Accident)

स्थानिकांनी गाडीच्या काचा फोडल्या

जेव्हा ही घटना घडली, लोकांनी लगेच त्या गाडीतील तरूणांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गाडीतील इतर दोनजण पळून गेले होते. मात्र त्यावेळी एक तरूण लोकांच्या हाती लागला. लोकांनी या तरुणाला बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर नागरिकांना जखमी झालेल्या तिघांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण संतप्त झालेल्या नागरिकांनी या गाडीची नासधूस केली, या गाडीच्या काचाही फोडल्या. तर, पोलिसांनी आता तिघांनाही ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. (Nagpur Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.