Nagpur Crime News : धक्कादायक! नागपुरात स्कूल व्हॅनवर ट्रान्सफॉर्मर कोसळला

348
Nagpur Crime News : धक्कादायक! नागपुरात स्कूल व्हॅनवर ट्रान्सफॉर्मर कोसळला
Nagpur Crime News : धक्कादायक! नागपुरात स्कूल व्हॅनवर ट्रान्सफॉर्मर कोसळला

नागपुरात वीज वितरण महामंडळाचा ट्रान्सफॉर्मर (electric transformer) स्कूल व्हॅनवर कोसळला (Nagpur Crime News) आहे. गंगाबाई घाट परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे विजेचे खांब आणि ताराही कोसळल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हा ट्रान्सफॉर्मर जीर्ण झाला होता. स्कूल व्हॅनवर त्याच्या तारा पडल्या. मात्र सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही. नागपुरात अनेक ठिकाणी तकलादू झालेले ट्रान्सफॉर्मर आहेत. ज्याच्याकडे महापालिकेचे लक्ष नाही.

(हेही वाचा –Sumit Nagal : सुमित नागल जागतिक क्रमवारीत ६८ व्या स्थानावर पोहोचला)

स्थानिकांनी महावितरण, आमदारांकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याची कुठलीही दखल घेतलेली नाही. ट्रान्सफॉर्मर कोसळून दोन गाड्याचं नुकसान झालं आहे. ट्रान्सफॉर्मर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडलीच आहे. पण तो आता दुरुस्त होईपर्यंत स्थानिकांची गैरसोय होईल असे देखील तेथील रहिवाश्यांनी सांगितलं आहे. कारण या परिसरात शालेय विद्यार्थी देखील राहतात. त्यांची या पुढील काही दिवसात गैरसोय होत असल्याचं सांगण्यात येत आहे. (Nagpur Crime News)

(हेही वाचा –Ashadhi Ekadashi 2024 : …तेव्हा मात्र भीती वाटते; Raj Thackeray यांनी पांडुरंगाच्या चरणी कोणती प्रार्थना केली ?)

विद्यार्थ्यांनी भरलेल्या या व्हॅनवर ट्रान्सफार्मर पडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पण कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही. पण आता तरी प्रशासनाला जाग येईल का? आणि असे जुने झालेले ट्रान्सफार्मर हटवले जातील का? याकडे स्थानिकांचं लक्ष लागून राहिलं आहे. (Nagpur Crime News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.