नागपूर शहरातील विमानतळ (Nagpur International Airport) बॉम्बने उडवून देण्याची धमकी पुन्हा एकदा मेलद्वारे देण्यात आली. ‘एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया’च्या मेल-आयडीवर धमकीचा मेल पाठविण्यात आला आहे. 6 दिवसांपूर्वीच नागपूरसह देशातील 40 विमानतळांना बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. (Nagpur International Airport)
(हेही वाचा –Emergency : आणीबाणीवरून पंतप्रधान मोदींची एक्स पोस्ट; काँग्रेसवर टीका करत म्हणाले…)
या धमकीची माहिती पुढे येताच विमानतळ अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. तत्काळ सोनेगाव पोलिसांना सूचना दिली गेली. तातडीने अग्निशमन दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक, सीआयएसएफ, श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. (Nagpur International Airport)
(हेही वाचा –BMC Property Tax: झोपड्यांचा कमर्शियल वापर, महापालिका आकारणार ‘हा’ कर ?)
संपूर्ण विमानतळाची अगदी कानाकोपऱ्यात झाडाझडती घेण्यात आली. दरम्यान, संशयास्पद असे काहीही सापडले नाही. ई-मेल कुठून आला आणि कोणी पाठवला याचा तपास सुरू आहे. गेल्या 2 महिन्यांत विमानतळ उडवण्याची धमकी देणारा मेल पाठवण्याची ही तिसरी वेळ आहे. (Nagpur International Airport)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community