मुंबई-नागपूर शहराला नशेच्या सौदागारांनी विळखा घातला आहे. नागपूर शहरात मॅफेड्रोन (MD) तयार करणारे बेकायदेशीर कारखाने उभे राहू लागले आहेत. महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) नागपूर शहरातील पाचपावली भागात एका बांधकामधीन इमारतीत छापा टाकून एमडी तयार करण्याचा कारखाना उद्धवस्त करण्यात आला आहे. या छापेमारीत मॅफेड्रोन तयार करण्यासाठी लागणारा ७८ कोटी रुपयांचा कच्चा माल आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच तीन जणांना अटकही करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Sanjay Shirsat यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल )
महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबई झोनल युनिटने गुप्त माहितीच्या आधारे, नागपूर शहरातील पाचपावली भागात एक बांधकामाधीन इमारतीत शनिवारी छापा टाकला, या छाप्यात मेफेड्रोनच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली सर्व रसायने, साहित्य आणि यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. या इमारतीत अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना तसेच एक प्रयोगशाळा तयार करण्यात आली होती. या ड्रग्स कारखान्याचा मास्टरमाइंड असलेल्या आरोपीने प्रथम यंत्रसामग्रीचा संपूर्ण संच खरेदी केला आणि अमली पदार्थ तयार करण्याचा सेटअप उभा केला होता, या कारखान्यात १०० किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन तयार करण्याची क्षमता असलेला कच्चा माल मिळवून या ठिकाणी एमडी हा अमली पदार्थ तयार करण्यात येत होता. या टोळीने ५० किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन तयार केले होते आणि हे एमडी क्रिस्टलाइज्ड पावडर स्वरूपात उत्पादन बाहेर आणण्यासाठी त्यावर पुढील प्रक्रिया सुरू होती अशी माहिती डीआयआरच्या अधिकाऱ्यांनी दिली.
डीआयआरने टाकलेल्या छाप्यात ७८ कोटी रुपये किमतीचे ५१.९५ किलो मेफेड्रोन (MD) तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध NDPS कायदा, 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील चौकशीसाठी डीआरआय कोठडीत पाठवण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान डीआरआय पथकाला नागपूर पोलिसांचेही सहकार्य लाभले. पुढील तपास सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community