बेळगाव जेलमधून गॅंगस्टरने केला गडकरींना धमकीचा फोन; नागपूर पोलिसांचे पथक कर्नाटकला रवाना

143

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवर मिळालेल्या धमकी प्रकरणी नागपूर पोलिसांचे पथक तपासासाठी कर्नाटकातील बेळगावला रवाना झाले आहे. गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात शनिवारी फोन करून 10 कोटींची खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

( हेही वाचा : धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्याकडून महिलेचा विनयभंग; औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल)

केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयजवळ असलेल्या जनसंपर्क कार्यालयात 14 जानेवारी रोजी 3 वेळा धमकीचे फोन कॉल होते. शनिवारी सकाळी 11:29 वाजता, 11:35 वाजता आणि दुपारी 12:32 वाजता हे फोन कॉल करण्यात आले होते. फोनवर खंडणीची रक्कम न दिल्यास गडकरी यांना जीवे मारू अशी धमकी दिली. धमकी देणाऱ्याने ‘दाऊद’ असा शब्द उच्चारल्यानंतर गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना घटनेची माहिती दिली.

नागपूर पोलिसांचे पथक कर्नाटकला रवाना

पोलिसांनी लगेच या प्रकरणाचा तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती पुढे आली. गडकरींच्या कार्यालयाला फोनवर धमकी देणाऱ्या गुन्हेगाराचे नाव जयेश पुजारी असून तो हत्या केल्याच्या शिक्षेप्रकरणी कर्नाटकातील बेळगाव कारागृहात आहे. यापूर्वी 2016 मध्ये जयेश जेल तोडून पळाला होता. तसेच यापूर्वी देखील त्याने अनेकांना धमकीचे फोन केल्याची माहिती पुढे आली आहे. कर्नाटकातील तुरुंगातून असे प्रकार सुरू असतात. त्यामुळे गडकरींना धमकी देण्यामागे केवळ जयेश पुजारी आहे की, इतर मोठे गुन्हेगारही यात सहभागी आहेत ? याचा पोलिस तपास करत आहेत. गडकरींना धमकी देण्यामागे नेमके कोण आहेत ? याच प्रश्नाची उकल करण्यासाठी नागपूर पोलिसांचे पथक बेळगावला रवाना झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.