नागपूर : तीन चिमुकल्यांचा ‘या’ कारणामुळे झाला खेळता-खेळता मृत्यू

एकाचवेळी परिसरातील तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

239
नागपूर : तीन चिमुकल्यांचा 'या' कारणामुळे झाला खेळता-खेळता मृत्यू

नागपूर येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन चिमुकल्यांचा खेळता- खेळता दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका परिसरातून सहा वर्षे वयोगटातील दोन मुले आणि एक मुलगी बेपत्ता झाले होते. या मुलांचे एका कारमध्ये मृतदेह सापडले आहेत. एकाच वेळी तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शनिवारी (१७ जून) संध्याकाळी ही तीनही मुलं टेका नाकाजवळील फारुख मैदानावर खेळायला गेली होती. रात्र झाली तरी घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी लगेच त्या भागातील उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले. परंतु, मुलांचा तपास काही लागला नाही.

त्यांनतर “या मुलांचे मृतदेह फारुख नगर येथील मैदानात पार्क केलेल्या एका जुन्या कारमध्ये सापडले. ही मुलं त्या कारमध्ये खेळत होती. खेळता खेळता ही मुलं गाडीमध्ये लॉक झाली. त्यामुळे त्यांना बाहेर पडणं मुश्किल झालं. त्यामुळे या मुलांचा गुदमरून आणि उष्णतेमुळे मृत्यू झाला”, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

(हेही वाचा – इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सात्त्विक-चिरागचे ऐतिहासिक यश)

या तीन चिमुकल्यांमध्ये दोन भावंडे आणि त्यांची एक मैत्रीण होती. एकाचवेळी परिसरातील तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी सायंकाळपासून ही मुलं सापडत नव्हती. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही त्यांचा शोध लागला नसल्याने त्यांचं अपहरण झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. परंतु, नंतर रविवार १८ जून रोजी एका कारमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. या मुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे पालकांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. आपलं मुलं कुठे खेळत आहे याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. तसेच वाहन मालकांनी देखील आपली गाडीचे दार व्यवस्थित बंद आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.