Nagpur Violence : हिंसाचार भडकवण्यासाठी बांगलादेशमधून चिथावणी; पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क

44

नागपुरच्या दंगलींवर राजकीय वातावरण बरेच तापले आहे. (Nagpur Violence) या हिंसाचारात बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. या काळात पोलिसांवर हल्ले झाले, महिला पोलिसांचाही विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चिथावणीखोर पोस्टच्या तपासणीदरम्यान पोलिसांना दंगेखोरांचे बांगलादेशशी कनेक्शन आढळून आले. ही माहिती समोर आल्यानंतर पोलीस आणि गुप्तचर संस्था सक्रीय झाल्या आहेत. शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि या दिशेने तपासही सुरू केला आहे.

(हेही वाचा – महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत स्वच्छतागृहे मिळावीत; आमदार Chitra Wagh यांची विधान परिषदेत मागणी)

नागपुरात मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक (bangladeshi infiltrators) बेकायदेशीरपणे राहतात. मध्य आणि उत्तर नागपूरच्या दाट लोकवस्ती असलेल्या भागात मोठ्या संख्येने त्यांचा निवास आहे. अशा परिस्थितीत नागपूरमध्ये पसरलेल्या हिंसाचारात बांगलादेशचा संबंध असण्याची शक्यता असल्याने पोलीस सतर्क झाले आहेत.

सामाजिक माध्यमांवर अफवा परसल्यामुळे नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात दंगल उसळली. या माध्यमातून उन्माद पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. शहर पोलिसांची सायबर टीम (Cyber ​​Team) सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे व विविध खात्यांची सखोल तपासणी सुरु आहे. प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्यांविरोधात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका फेसबुक अकाऊंटवरून एका विशिष्ट समुदायाविरुद्ध अत्यंत अपमानास्पद भाषेत टिप्पणी करण्यात आली. ते फेसबुक अकाउंट बांगलादेशातून नियंत्रित होत असल्याची बाब समोर आली. यामुळे पोलीसदेखील हादरले. यानंतर गुप्तचर संस्थाही (intelligence agencies) सतर्क झाल्या आहेत व सखोल चौकशी सुरू झाली आहे. या घडामोडीला सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दुजोरा दिला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. (Nagpur Violence)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.