Nagpur Violence : नागपूरमधील राड्यानंतर पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन, 80 जणांना अटक

Nagpur Violence: नागपूरमधील राड्यानंतर पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन, 80 जणांना अटक

69
Nagpur Violence : नागपूर घटनेवर प्रवीण दरेकरांचा तीव्र शब्दात निषेध,
Nagpur Violence : नागपूर घटनेवर प्रवीण दरेकरांचा तीव्र शब्दात निषेध, "दंगल करणाऱ्यांना सोडणार नाही"

नागपूरमध्ये (Nagpur Violence) औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद पेटला. काल (सोमवारी 17 मार्च ) रात्री दोन गट आमने सामने येऊन त्यांच्यात तूफान हाणामारी झाली. नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून हा राडा झाला. औरंगजेबाच्या कबर हटवण्याच्या मागणीच्या निदर्शनानंतर नागपुरात हिंसा भडकली. (Nagpur Violence)

हेही वाचा-Water Cut : पूर्व उपनगराच्या टोकाला पाणी समस्या, मंगळवारी मिळणार नाही पाणी…

त्यानंतर वाहनांची जाळपोळ सुरू करण्यात आली. हल्लेखोरांनी पोलिसांवरही दगडफेक केली. त्यात काही पोलीस जखमी झाले. या हल्ल्यामुळे नागपूरमध्ये तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास 80 जणांना अटक केली. (Nagpur Violence)

हेही वाचा-Aurangzeb च्या कबरीवरुन नागपुरात उद्रेक

सोमवारी रात्री हिंसा उसळल्यानंतर वीज आणि इंटरनेट बंद करण्यात आले होते. त्यानंतर दोन गटांकडून एकमेकांवर आणि पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली होती. सध्या नागपूरमध्ये संचारबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले असून महाल परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. काल रात्रभर पोलिसांचे अटकसत्र सुरु होते. याशिवाय, सायबर पोलिसांकडून जवळपास 1800 सोशल मिडिया अकाऊंटस तपासण्यात आली आहेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर आणि 55 व्हिडीओ पोलिसांच्या रडारवर आहेत. (Nagpur Violence)

हेही वाचा-वाढत्या नागरीकरणामुळे चिमण्यांची संख्या घटते; BMC सांगणार यावरील उपाय

या भागात 20 ते 22 वाहनांची तोडफोड करण्यात आली. मात्र, पोलिसांनी येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे. महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज (मंगळवारी) सकाळी 10 वाजता नागपूर येथे येत असून, ते महाल भागातील पाहणी करणार आहेत. प्रशासनातील वरिष्ठांशी संवाद करतील. मीडियाशी संवाद साधतील, अशी माहिती आहे. (Nagpur Violence)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.