उत्तराखंडमधील नैनितालमध्ये (Nainital Bus Accident ) प्रवाशांना घेऊन जाणारी बस 100 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 21 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक बालक, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. ही बस पिथौरागढहून (Pithoragarh) हल्द्वानीसाठी पहाटे 5 वाजता निघाली. नैनितालच्या भीमताल भागातील वोहरा कुनमध्ये दुपारी हा अपघात झाला. (Nainital Bus Accident )
हेही वाचा-Nashik Harsul Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने हरसूल हादरले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मिळालेल्या माहितीनुसार, चुकीच्या बाजूने येणाऱ्या अल्टोला वाचवण्याच्या प्रयत्नात बस दरीत कोसळली. माहिती मिळताच एसडीआरएफ, अग्निशमन विभाग, स्थानिक टीम आणि स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना दोरीच्या साह्याने आणि खांद्यावर घेऊन खंदकातून बाहेर काढण्यात आले. (Nainital Bus Accident )
हेही वाचा-Kalyan Minor Girl Murder Case प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस आयुक्तांना महत्त्वाचे निर्देश
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. अपघातानंतर सीएम पुष्कर धामी यांनी X वर लिहिले की, भीमतालजवळ बस अपघाताची बातमी दुःखद आहे. स्थानिक प्रशासनाला तातडीने मदत आणि बचाव कार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मी बाबा केदारनाथला प्रार्थना करतो. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. बचाव कार्याला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. (Nainital Bus Accident )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community