नालासोपारा (Nalasopara Crime) येथे एका नायजेरीन महिलेला दोन कोटींच्या मेफेड्रोन (MD)या अमली पदार्थासह अटक करण्यात आली आहे, एडिका जोसेफ (३०) असे अटक करण्यात आलेल्या नायजेरियन महिलेचे नाव असून पोलिसांनी तिच्या जवळून एक किलो मफेड्रोन (MD)जप्त करण्यात आला आहे. तुळींज पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक नायजेरियन महिला नालासोपारा पूर्व प्रगती नगर, रेल्वे रुळाजवळ एक नायजेरीन महिला अमली पदार्थाची डिलिव्हरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस पथकांनी प्रगती नगर येथे साध्या वेशात सापळा रचला, एक नायजेरीन महिला खाद्यावर बॅग लटकवून रुळाजवळ येताना दिसताच साध्या वेशातील महिला पोलिसांनी तीला ताब्यात घेऊन तिच्याजवळ असणाऱ्या बॅगेची झडती घेतली असता बॅगेत एक किलो मफेड्रोन (MD) हा अमली पदार्थ आढळून आला. (Nalasopara Crime)
पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता ती उडवा उडवी ची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांनी तीला ताब्यात घेऊन तुळींज पोलीस ठाण्यात आणून तिच्याकडे कसून चौकशी करण्यात आली असता तीने तिचे नाव एडिका जोसेफ (३०) असे असल्याचे सांगून ती एमडी या अमली पदार्थाची डीलव्हरी देण्यासाठी आली होती अशी माहिती समोर आली. पोलिसांनी तिच्याकडे पासपोर्ट आणि व्हिसा ची मागणी केली असता ती पर्यटन व्हिसावर भारतात आली होती, व तिच्या व्हिसाची कालावधी संपलेली असून ती बेकायदेशीर भारतात वास्तव्य करीत होती अशी माहिती तपासात समोर आली.तुळींज पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिच्याकडून जप्त करण्यात आलेला मफेड्रोन या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २ कोटी किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून एडिका जोसेफ ही एका मोठ्या ‘ड्रग्स सिंडिकेट’साठी काम करीत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी सांगितले. (Nalasopara Crime)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community