ठाणे पोलिसांनी दाखल केलेल्या दोन हजार कोटींच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट (Drug racket) आणि तस्करीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर लोकप्रिय अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) भारतात परतली आहे. सुमारे २५ वर्षांनी मुंबईत परतल्यानंतर भावुक झालेल्या ममता कुलकर्णीने (Mamta Kulkarni) एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे.
९० च्या दशकात प्रचंड लोकप्रिय झालेली ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) २००० साली भारताबाहेर गेली होती. दीर्घकाळापासून परदेशात वास्तव्यास असणारी ममता २५ वर्षांनी मुंबईत परतल्यानंतर भावुक झाली. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून ती सध्या मुंबईत असल्याची चर्चा आहे. अलीकडेच तिचा ‘करण अर्जुन’ हा सिनेमा रीलिज झाला आहे, त्या दरम्यान ममता भारतात परतली आहे.
(हेही वाचा – Maharashtra CM Oath Ceremony : शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर मुंबईतील वाहतुकीत ‘असे’ असतील बदल)
ममताने तिच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर केलेल्या सेल्फी व्हिडिओत ती भारतात परतण्याबद्दल भाष्य करताना दिसली, ‘नमस्कार मित्रांनो, मी ममता कुलकर्णी. (Mamta Kulkarni) मी आताच भारतात परतले… २५ वर्षांनी मुंबईमध्ये परतली आहे. ‘मी खरोखर भारावून गेले आहे आणि मला ते कसे व्यक्त करावे हे माहीत नाही. मी भावनिक आहे. खरंतर, फ्लाइट लँड झाल्यावर आणि फ्लाइट लँड होण्यापूर्वी, मी माझ्या डाव्या-उजव्या बाजूला पाहते होते. इतक्या वर्षांनी माझा देश मी वरुन पाहिला आणि मी भावूक झाले, माझ्या डोळ्यात पाणी आले. मी आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळाच्या बाहेर पाय ठेवला आणि मी पुन्हा खूप भारावून गेले होते’ असे तिने व्हिडिओमध्ये नमूद केले आहे.
(हेही वाचा – Devendra Fadnavis मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार! आझाद मैदानावर महायुतीच्या शपथविधीला ‘या’ दिग्गजांची उपस्थिती)
२०१६ साली ठाणे पोलिसांनी दाखल केलेल्या २००० कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात ममताचे नाव समोर आले होते. आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट आणि तस्करी करण्याच्या उद्देशाने एका गँगस्टरला मेथॅम्फेटामाइनच्या बेकायदेशीर उत्पादनासाठी इफेड्रिनचा पुरवठा करणाऱ्या आरोपींमध्ये तिचे नाव होते. ममता तिचा साथीदार विकी गोस्वामी आणि अन्य सहआरोपींसोबत जानेवारी २०१६ मध्ये केनियामध्ये आंतरराष्ट्रीय ड्रगसंबंधी एका बैठकीत सहभागी झाली होती, असा तिच्यावर आरोप होता.
मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) या प्रकरणाशी संबंधित तिच्या विरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हा रद्द केला आहे. त्यानंतर ती भारतात परतल्याचे बोलले जाते. ममताने ‘राम लखन’, ‘वक्त हमारा है’, ‘क्रांतीवीर’, ‘करन-अर्जुन’, ‘सबसे बडा खिलाडी’ असे अनेक गाजलेले सिनेमे केले आहेत. २००२ साली तिने शेवटचा बॉलिवूड सिनेमा केला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community