
नांदेड लगतच्या आलेगांव शिवारात एक ट्रॅक्टर विहिरीत पडून ८ शेतमजुरांचा मृत्यू (Nanded Accident) झाला आहे. हळद काढणीच्या कामासाठी ट्रॅक्टरमध्ये बसून जात असताना हा अपघात झालाय. या विहिरीला कठडा नसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येतंय. दरम्यान, ट्रॅक्टरसह महिलांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी क्रेनची मदत घेण्यात येतेय. या विहिरीला पाणी अधिकचे असल्याने मदतकार्यात अडथळा येतोय. (Nanded Accident)
हेही वाचा-BCCI International Fixtures : बीसीसीआयने भारतीय संघाचा २०२५ हंगामातील कार्यक्रम केला जाहीर
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघात एकूण 10 जण असल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी निवासी जिल्हाधिकारी महेश वदतकर यांनी या संदर्भात माहिती दिली असून 3 जाणंना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर अद्याप काही जण विहिरीमध्ये अडकून असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. सध्या घटनास्थळी गावकरी मदतीला हजर आहेत. (Nanded Accident)
हेही वाचा- Nothing Phone 3a : नथिंग फोनची ३ए मालिका मध्यम दर्जाच्या स्मार्टफोनमध्ये सर्वाधिक खपाची
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर ट्रॅक्टर हा एक १५ वर्षाचा मुलगा चालवत होता, अशी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झालं असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. (Nanded Accident)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community