नंदिग्राम एक्सप्रेसमध्ये (Nandigram Express) एक मृतदेह सापडल्यामुळे दादर रेल्वे स्थानक (Dadar Railway Station) पुन्हा हादरलं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. नंदिग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात 50 वर्षांचा व्यक्ती गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. रेल्वे पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात आणला.
(हेही वाचा –CM Eknath Shinde: मुंबई-नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश )
हा मृत व्यक्ती मूळचा घाटकोपर परिसरातील रहिवासी होता. काही दिवसांपूर्वी त्याच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तो त्या प्रकरणात फरार होता. या प्रकरणामुळे मानसिक तणावात असलेल्या मृत व्यक्तीने आपले जीवन संपवले असल्याचा प्राथमिक संशय आहे. आरोपीने नांदिग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात स्वतःला गळफास लावण्यासाठी त्याच्याकडील मफलरचा वापर केल्याचं समोर आलं आहे. दादर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (Nandigram Express)
काही दिवसांआधी दादर रेल्वे स्थानकात सोमवारी मध्यरात्री तुतारी एक्स्प्रेसमध्ये मृतदेह असलेली एक सुटकेस आढळून आली होती. याप्रकरणी जय चावडा आणि शिवजीत सिंग या दोघांना अटक करण्यात आली होती. या दोघांनी अर्शद अली सादीक अली शेख याची हत्या करुन त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये (Dadar Suitcase Murder) भरला होता. या घटनेनं दादरमध्ये एकच खळबळ उडाली होती. (Nandigram Express)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community