Narco Test Department Raid : नार्कोटेस्ट विभागाची शिरूरमध्ये धडक कारवाई; तब्बल १७४ किलो ड्रग्ज जप्त

फिनेल बनवणाऱ्या कंपनीत बनवले जात होते ड्रग्ज

264
Narco Test Department Raid : नार्कोटेस्ट विभागाची शिरूरमध्ये धडक कारवाई; तब्बल १७४ किलो ड्रग्ज जप्त

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात नार्कोटिक्स विभागाकडून (Narco Test Department Raid) मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका कंपनीमध्ये फिनेलच्या नावाखाली चक्क ड्रग्जची निर्मिती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलीस नार्कोटिक्स विभागाकडून ही कंपनी सील करण्यात आली असून या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल १७४ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

सध्या देशभरासह राज्यभरात ड्रग्ज (Narco Test Department Raid) प्रकरण चांगलेच गाजत आहे. मुंबई व पुणे शहरात मोठी टोळी कार्यरत असल्याचे बोलले जात असताना शिरुर तालुक्यातील छोटयाशा मिडगुलवाडी गावात नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने एका कंपनीवर छापा टाकला. या कारवाईत तब्बल एकशे चौऱ्याहत्तर किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. तसेच दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. पथकाने ही कंपनी सील केली असून परिरात खळबळ उडाली आहे.

मिडगुलवाडी (ता. शिरुर) येथे एका फिनेल बनवणाऱ्या कंपनीवर नार्कोटिक्स विभागाच्या (Narco Test Department Raid) पथकाने शिक्रापूर पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छापा टाकला. ही कारवाई इतकी गोपनीय होती की यावेळी पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तीस तासांहून अधिक काळ ही कारवाई सुरु होती. या कारवाईने पोलिस देखील चक्रावून गेले आहेत. दरम्यान येथे मोठ्या प्रमाणात केमिकल आढळून आले आहे. या पत्र्याच्या शेडमध्ये फरशी पुसण्याचे फिनेल हे केमिकल बनवले जात असल्याचे ग्रामस्थ सांगत होते. शेड व कंपनी ही जंगलात असल्याने कोणालाही काही माहिती नव्हती.

(हेही वाचा – Mahadev Book Application : महादेव बुक अ‍ॅपच्या प्रवर्तकांची अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत हातमिळवणी)

नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने (Narco Test Department Raid) केलेल्या या कारवाईत १७४ किलो अल्प्राझोलम नामक ड्रग्ज व इतर साहित्य जप्त करण्यात आले. संपूर्ण कंपनीचे मुख्य शटर तसेच गेट सील करण्यात आले आहे. या कारवाईत शेकडो लिटर केमिकल ओतून देत काही साहित्य जाळून नष्ट केले. तर त्या कंपनीचे शेड मागे केलेल्या मोठ्या दोन खड्डयांमध्ये काही केमिकल व ड्रग्ज सदृश पदार्थ दिसत असून शेडच्या परिसरात उग्र वास येत आहे. मात्र सदर कारवाईने शिरुर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या कारवाईने शिरूर तालुका हा ड्रग्जच्या (Narco Test Department Raid) लिस्टवर आला आहे. हा अड्डा कारवाईच्या रडारवर आल्याने अमली पदार्थांची पाळेमुळे खोलवर रूजल्याचे दिसून येत आहे.

या प्रकरणाचा ललित पाटील प्रकरणाशी काही संबंध आहे का?

पुणे जिल्ह्यात सध्या ललित पाटील प्रकरण चांगलेच तापले असताना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव व मिडगुलवाडी या दोन्ही ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जसाठा जप्त केला गेल्याने या घटनेशी ललित पाटील चा काही संबंध आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.