भारतीय तटरक्षक दल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)आणि गुजरात एटीएसने गुजरात किनाऱ्याजवळ मोठी कारवाई केली आहे. या यंत्रणांनी गुजरात किनारपट्टीजवळील आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळ सुमारे ९० किलो ड्रग्जसह १४ पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून गुप्तचर माहितीच्या आधारे एजन्सीकडून ही कारवाई सुरू होती, सुरक्षा अधिकाऱ्यांनी रविवारी, (२८ एप्रिल) यासंदर्भातील माहिती दिली. (Narcotics Control Bureau)
(हेही वाचा – PM Narendra Modi: वायनाड जिंकण्यासाठी काँग्रेसने पीएफआयची मदत घेतली, पंतप्रधान मोदींचा घणाघात)
भारतीय तटरक्षक दल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) ही संयुक्त मोहीम राबवली. गेल्या काही दिवसांपासून गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही मोहीम राबवली जात होती. यासंदर्भात अधिक माहिती मिळण्याच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत, असे अधिकाऱ्यांनी एएनआयला सांगितले.
Join Our WhatsApp CommunityAnti #Narco #Operations @IndiaCoastGuard Ship Rajratan with #ATS #Gujarat & #NCB @narcoticsbureau in an overnight sea – air coordinated joint ops apprehends #Pakistani boat in Arabian Sea, West of #Porbandar with 14 Pak crew & @86 Kg contraband worth approx ₹ 600Cr in… pic.twitter.com/N49LfrYLzz
— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) April 28, 2024