Nashik Accident : वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या दोन मुली, जावयावर काळाचा घाला; मालेगावातील हृदयद्रावक घटना

180
Nashik Accident : वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या दोन मुली, जावयावर काळाचा घाला; मालेगावातील हृदयद्रावक घटना
Nashik Accident : वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या दोन मुली, जावयावर काळाचा घाला; मालेगावातील हृदयद्रावक घटना

मालेगावमधून (Malegaon) एक हृदयद्रावक घटना (Nashik Accident) समोर येत आहे. वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन मुली आणि जावयाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून नात गंभीर जखमी झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) मालेगावच्या वाके शिवारात ही घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नात गंभीर जखमी

उभ्या असलेल्या कंटेनरवर टाटा पंच गाडी जावून धडकल्याने हा अपघात झाला आहे. अपघातात मीनाक्षी अरुण हिरे, सुनंदा विकास सावंत, विकास चिंतामण सावंत या तिघांचा मृत्यू झाला. तर नात वैभवी प्रवीण जाधव ही गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी नातीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे मालेगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nashik Accident)

अपघात मालिका सुरूच…

दरम्यान, नाशिक शहरात बसच्या धडकेत एका शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. नाशिकरोड मालधक्का रोडवरील मनपा सिटीलिंक बस डेपोमध्ये ही घटना घडली. बस डेपोच्या आवारात जिजाबाई गवई यांची चहाची टपरी असून त्यांची नात सानवी सागर गवई ही तिच्या आजोबांसोबत शाळेतून चहा टपरीवर जात होती. दरम्यान सिटीलींक बस चालकाने भरधाव वेगाने तिला मागून धडक दिली. या अपघातात तिच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने तिचा जागेवर मृत्यू झाला. तर तिच्या आजोबांचा जीव थोडक्यात बचावला असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. (Nashik Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.