Nashik Bus Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात! तिघांना चिरडत बस थेट चौकशी कक्षावर धडकली

236
Nashik Bus Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात! तिघांना चिरडत बस थेट चौकशी कक्षावर धडकली
Nashik Bus Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात! तिघांना चिरडत बस थेट चौकशी कक्षावर धडकली

नाशिकमधील (Nashik Bus Accident) मेळा बसस्थानकात दुर्दैवी घटना घडली आहे. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने तीन जण चिरडले गेले आहेत. यात एकाचा दु:खद मृत्यू झाला आहे. या अपघातात इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर बसचालकाला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. (Nashik Bus Accident)

हेही वाचा-सशस्त्र सेना ध्वजनिधीला सर्वांचे योगदान गरजेचे – राज्यपाल C. P. Radhakrishnan

अपघातग्रस्त बस ही एक महाराष्ट्र परिवहन महामंडळाची इलेक्ट्रिक बस (Electric bus) होती. हा अपघात होताच प्रवासी आक्रमक झाले. बस चालकाला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. मात्र प्रवासासाठी निघालेल्या एक प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. (Nashik Bus Accident)

हेही वाचा-दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाचा धुरा सांभाळण्यासाठी Devendra Fadnavis सज्ज

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या मेळा बसस्थानकात (Mela Bus Stand) फलाट क्रमांक सहाच्या बाजूला एक चौकशी कक्ष आहे. याच चौकशी कक्षाच्या आजूबाजूला बस येऊन उभ्या राहतात. येथे 6 डिसेंबरच्या रात्री ठरलेल्या वेळेत एक बस बसस्थानकात येऊन थांबत होती. मात्र याच वेळी बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट चौकशी कक्षाला जाऊन धडकली. या दुर्घटनेत बसने एकूण तिघांना चिरडलं. यातील एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. (Nashik Bus Accident)

हेही वाचा-राष्ट्रपती Droupadi Murmu यांच्या हस्ते ११ डिसेंबरला राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचे वितरण; पुरस्कारात महाराष्ट्र द्वितीय स्थानी

या बसने तीन प्रवाशांना चिरडले यात अंजली थट्टीकोंडा ही महिला प्रवाशी जागीच मृत्युमुखी पडली आहे. ही भाविक महिला आंध्र प्रदेश येथील असल्याची माहिती मिळत आहे. तर इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर नाशिकच्या खाजगी रुग्णालय उपचार सुरू आहेत. बस चालक उमेश भाबड याला मुंबई नाका पोलिसांची ताब्यात घेतले. अधिकचा तपास नाशिक पोलीस करत आहेत. (Nashik Bus Accident)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.