नाशिक जिल्ह्यातील (Nashik Crime) पंचवटी शहरामध्ये एका पोत्यामध्ये मानवी कवट्या आणि हाडे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पंचवटीमधील एरंडवाडीमध्ये मंदिर परिसरात भरवस्तीत पोत्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हाडे आणि कवट्या मिळाल्यानंतर चांगलीच चर्चा रंगली. (Nashik Crime)
मानवी हाडे आणि कवट्या प्लास्टिकचे
पंचवटीमध्ये एरंडवाडी येथील मंदिराच्या परिसरामध्ये मानवी हाडे आणि कवट्या असलेली पोतं मिळाल्याची बातमी समजल्यानंतर पंचवटी पोलिस त्या ठिकाणी तातडीने पोहोचले. पोलिसांनी मानवी हाडे आणि कवट्या असलेलं पोतं ताब्यात घेतलं. दरम्यान, पंचवटी पोलिसांनी याचा सखोल तपास करत ही मानवी हाडे आणि कवट्या प्लास्टिकचे असल्याचे सांगितले. (Nashik Crime)
अघोरी प्रकार करण्यासाठी हा प्रकार?
दरम्यान, अघोरी प्रकार करण्यासाठी ही हाडे आणि कवट्या आणल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, भरवस्तीमध्ये मानवी कवट्या सापडल्याने एकच खळबळ उडाली. तथापि, कवट्या खऱ्या नसल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, यामागे सूत्रधार कोण हा प्रश्न मात्र अजून गुलदस्त्यात आहे. पंचवटी पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी हा अघोरी प्रकार कोणी केला, याची माहिती घेण्यासाठी मंदिरातील पुजारी आणि इतर नागरिकांना तपासण्यासाठी बोलावून घेत चौकशी केली. मंदिर परिसरामध्ये हाडे आणून नेमका कोणता प्रकार केला हे आता पोलीस तपासानंतर समोर येणार आहे. (Nashik Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community