Nashik FDA Action : तुम्ही पनीर खाताय; ‘इतक्या’ किलोंचा बनावट पनीर साठा नष्ट

पनीरमध्ये खाद्य तेलाची भेसळ असल्याचा संशय आला त्यावरुन १६ हजार २८० रुपये किमतीचा सुमारे ७४ किलो साठा जप्त करण्यात आला.

93

अन्न औषध प्रसासनाने शहराच्या सिडको व अंबड भागातून ८४ हजार ११० रुपये किमतीचा ३९७ किलो बनावट पनीर साठा दोन ठिकाणाहून जप्त केला असून तो तातडीने नष्ट करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे अन्न औषध प्रशासनाला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. पथकाने ही कारवाई करताना अत्यंत खबरदारी घेतली होती. गुरुवार ( ८ नोव्हे) रोजी ६.३० वाजेपासून सिडको येथे सापळा रचण्यात आला होता. (Nashik FDA Action)

मिळालेल्या माहितीनुसार मे. विराज एंटरप्रायजेस, दुर्गा मंदिरच्या मागे, त्रिमुर्ती चौक, सिडको, नाशिक या ठिकाणी तपासणी केली असता पनीरमध्ये खाद्य तेलाची भेसळ असल्याचा संशय आला त्यावरुन १६ हजार २८० रुपये किमतीचा सुमारे ७४ किलो साठा जप्त करण्यात आला. हा साठा नष्ट करण्यात आला आहे.दुसरी कारवाई गुरुवार (९ नोव्हे)रोजी करण्यात आली. ही कारवाई सकाळी ७.३० वाजता करण्यात आली. अंबड येथील साई एंटरप्रायजेस, साईग्राम कॉलनी, उपेंद्रनगर पाण्याच्या टाकीजवळ, या दुकानाची तपासणी केली असता या ठिकाणी पनीरमध्ये खाद्यतेलाची भेसळ असल्याचा संशय आला. त्यावरुन ६७ हजार ८३० रुपये किमतीचा ३२३ किलो किलो साठा जप्त करण्यात आला. हा सर्व साठा नष्ट करण्यात आला आहे.

(हेही वाचा :Raj Thackeray : हायकोर्टाकडून दिलासा, काय आहे नेमके प्रकरण जाणून घ्या..)

दोन्ही पनीर चे अन्ननमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषकांकडे पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच विश्लेषण अहवालाच्या अनुषंगे अन्न सुरक्षा मानके कायदयाअंतर्गत पुढील आवश्यक कारवाई करण्यात येणार आहे, ही कारवाई, सहायक आयुक्त (अन्न) मनीष सानप व विनोद धवड यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील,अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे, वाहनचालक निवृत्ती साबळे यांच्या पथकाने केली आहे. सह आयुक्त (नाशिक विभाग) संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नागरीकांनी दुधापासून तयार झालेली मिठाई खरेदी करतांना खरोखर त्यामध्ये दुध, खवा, मलई किंवा इतर दुग्धजन्य पदार्थापासून तयार केलेले आहेत किंवा कसे याची खात्री करुनच खरेदी करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.