राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वर्ष-२०२३ ची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारी नुसार नाशिक हे लाचखोरीत पहिल्या क्रमांकावर असून मुंबई मात्र लाचखोरीत सर्वात शेवटी आहे. लाचखोरीत दुसऱ्या क्रमांकावर पुणे असून संभाजी नगर हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून राज्यात जानेवारी ते १४ डिसेंबर २०२३ या कालावधीत ७६४ लाचखोरीचे गुन्हे दाखल केले १०६७ जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. (Bribery)
महाराष्ट्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) १ जानेवारी ते १४ डिसेंबर २०२३ पर्यंत राज्यातील लाचखोरी प्रकरणातील आकडेवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीनुसार राज्यातील नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक लाचखोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्या पाठोपाठ पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून तिसऱ्या क्रमांकावर संभाजी नगर आणि लाचखोरीत चौथ्या क्रमांकावर ठाणे जिल्हा आहे. मुंबईत सर्वात कमी लाचखोरीचे गुन्हे दाखल असून यंदा मुंबई हे लाचखोरीत सर्वात शेवटी आहे. (Bribery)
(हेही वाचा – Security Alert: जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा अलर्ट मोडवर, जाणून घ्या कारण…)
सर्वात जास्त गुन्हे ‘या’ विभागात
लाचखोरीत राज्यात ७६४ लाचखोरीचे गुन्हे दाखल केले १०६७ जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामध्ये सर्वात जास्त गुन्हे (सापळे) महसूल विभागात लावण्यात आले असून संपूर्ण राज्यात महसूल विभागात १९०गुन्हे दाखल झाले असून त्यापाठोपाठ पोलीस विभागात १३७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तिसऱ्या क्रमांकावर पंचायत समिती, चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आहे. (Bribery)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community