सिक्किम हिमस्खलन : सहा पर्यटकांचा मृत्यू, ८० हून अधिक जण अडकल्याची शंका

100

सिक्किमच्या नाथुला भागात मंगळवारी हिमस्खलन होऊन सहा पर्यटकांचा मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमींना राजधानी गंगटोक येथील रुग्णालयात दाखल केले जात आहे. तसेच अजूनही जवळपास ८० पर्यटक आतमध्ये अडकल्याची शंका पोलिस आधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

राजधानी गंगटोक येथील एका रुग्णालयात जखमींना नेले जात आहे. एका वरिष्ठ पोलिस आधिकाऱ्याच्या माहितीनुसार बचावकार्य चालू आहे. नाथुलाच्या लगतच चीनची सीमा असून आपल्या नैसर्गिक सुंदरतेमुळे पर्यटकांच नाथुला हे मुख्य आर्कषणाचे ठिकाण राहिलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी नाथुलामध्ये दुपारी १२.२० च्या आसपास  हिमस्खलन झाले. दुर्घटननेत सहा जणांनी आपला जीव जवळच्या रुग्णालयात गमवला. मृतांमध्ये चार पुरूष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. गंगटोक आणि नाथुलाला जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरु रस्त्यावर हिमस्खलन झालं अशी माहिती पोलिसांनी दिली.

(हेही वाचा पुनर्विकासामुळे स्थलांतरित बीडीडी चाळीतील रहिवाशांची संक्रमण शिबिरात होते पाण्यासाठी फरफट)

३० जणांना बाहेर काढण्यात यश

१५० हून अधिक पर्यटक अजूनही घटनास्थळी अडकले आहेत. यामध्ये बर्फात अडकलेल्या ३० जणांना वाचवण्यात यश आले असून त्यांना गंगटोकच्या एसटीनएम आणि सेंट्रल रेफरल रुग्णालयात दाखल केले गेले आहे. सिक्किम पोलिस, सिक्किम ट्रैवल असोसिएशन व पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बचाव मोहिम चालू आहे. ही घटना १५ मैलावर घडली, अशी माहिती चेकपोस्टचे महानिरिक्षक सोनम भूटिया यांनी म्हटले

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.