Crime in India: देशात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोकडून धक्कादायक आकडेवारी उघड

२०२२ मध्ये देशभरात २८ हजार ५२२ खुनांच्या गुन्ह्यांची नोंद झाली.

154
Crime in India: देशात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोकडून धक्कादायक आकडेवारी उघड
Crime in India: देशात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोकडून धक्कादायक आकडेवारी उघड

देशातील गुन्ह्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या क्राइम इन इंडिया या अहवालानुसार, २०२२ मध्ये देशभरात २८ हजार ५२२ खुनांच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून प्रत्येक दिवशी ७८ हत्या झाल्याची माहिती या अहवालाद्वारे उघड झाली आहे.

देशभरात महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांच्यावरील गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे ४ टक्के, ८.७ टक्के, ९.३ टक्के, १३.१ टक्के आणि १४.३ टक्के वाढ झाली आहे, तर आर्थिक गुन्ह्यांमध्ये ११.१ टक्के वाढ झाली आहे.

या अहवालानुसार, देशभरात भ्रष्टाचार १०.५ टक्क्यांनी वाढला असून, सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल २४.४ टक्के वाढ झाली आहे.

महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले
२०२२मध्ये महिलांवरील अत्याचारात २०२१च्या तुलनेत ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२२मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या ४ लाख ४५ हजार २५६ गुन्ह्यांची नोंद झाली असून, २०२१ मध्ये हे प्रमाण ४,२८,२७८ इतके होते. पती किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून छळ होत असल्याची प्रकरणे सर्वाधिक ३१.४ टक्के असून, अपहरणाची प्रकरणे १९.२ टक्के आहेत. महिलांवर प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांची १८.७ टक्के प्रकरणे दाखल झाली आहेत, तर ७.१ टक्के प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलांच्या छळाची नोंद
२०२२ मध्ये नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या क्राइम इन इंडिया अहवालानुसार, १, ६२,४४९ मुलांच्या छळाच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. २०२१मध्ये हेच प्रमाण १,४९,४०४ इतके होते. २०२२ मध्ये यात ८.७ टक्के वाढ झाली आहे. यातील बहुतांश गुन्हे अपहरणाशी संबंधित आहेत.

वृद्धांवरही हल्ले
२०२१ मध्ये ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले करणे, त्यांची फसवणूक करण्याचे २६,११० गुन्हे दाखल झाले होते. यात तब्बल ९.३ टक्क्यांनी वाढ होऊन हे प्रमाण ३८,५४५ इतके झाले आहे. यापैकी बहुतांश गुन्हे चोरी, फसवणूक करणे यासंदर्भात आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.