National Crime Records Bureau Report: अत्याचाराच्या घटनेत ‘युपी’ पहिल्या क्रमांकावर तर, महाराष्ट्र कितव्या स्थानी?

82
National Crime Records Bureau Report: अत्याचाराच्या घटनेत 'युपी' पहिल्या क्रमांकावर तर, महाराष्ट्र कितव्या स्थानी?
National Crime Records Bureau Report: अत्याचाराच्या घटनेत 'युपी' पहिल्या क्रमांकावर तर, महाराष्ट्र कितव्या स्थानी?

कोलकाता, बदलापूर प्रकरणानंतर अत्याचारांच्या घटनांमुळे (National Crime Records Bureau Report) रोष निर्माण झाला असतानाच राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) एका अहवाल प्रसिद्ध केला. यानुसार देशात दर आठवड्याला किमान पाच बलात्कार-हत्यांची नोंद होते. २०१७ ते २०२२ या सहा वर्षांत महिलांवरील अत्याचारांचे सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशमध्ये नोंदवण्यात आले, तर महाराष्ट्र याबाबत चौथ्या स्थानी आहे. देशात सहा वर्षांच्या काळात बलात्कार/सामूहिक बलात्कारानंतर महिलांची हत्या केल्याचे तब्बल १,५५१ गुन्हे नोंदवले गेले. यापैकी सर्वाधिक २८० प्रकरणे उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आली.

अनेक प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात पोलिसांना अपयश आल्याचेही दिसून आले. यानंतर मध्य प्रदेश (२०७), आसाम (२०५), महाराष्ट्र (१५५) आणि कर्नाटक (७९) यांचा क्रमांक आहे. त्या सहा वर्षांत देशात दर आठवड्याला बलात्कार आणि हत्येच्या पाच घटना घडल्या. यात मागच्या दोन वर्षांतील महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. (National Crime Records Bureau Report)

२०१८मध्ये देशात सर्वाधिक २९४, तर २०२०मध्ये कमी म्हणजे २१९ बलात्कार/सामूहिक बलात्काराच्या घटनांची नोंद झाली. सन २०१७मध्ये हा आकडा २२३, २०१९मध्ये २८३ होता. सन २०२१मध्ये अशा प्रकरणांची संख्या २८४, सन २०२२ २४८ इतकी होती. (National Crime Records Bureau Report)

लोकसेवकांवरील गुन्हे
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रीफॉर्म्स (एडीआर) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (एनईडब्ल्यू) यांच्या एका अहवालानुसार, देशातील तब्बल १५१ विद्यमान लोकसेवकांवर महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे दाखल असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या १५१ नेत्यांपैकी १६ खासदार आणि १३५ विद्यमान आमदार आहेत. (National Crime Records Bureau Report)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.