देशात दहशत माजवणाऱ्या आणि दहशतवादी कृत्यांना पाठिंबा देणाऱ्या १५ लोकांना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (National Investigation Agency) अटक करण्यात आली आहे. सातत्याने दहशतवादी कृत्य होणे, अनेक सरकारी यंत्रणांना धमक्यांचे फोन येणे, याबाबत देशातील सुरक्षा यंत्रणा सतत मोडवर असते या गुन्ह्यांकरिता ही कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)कडून शनिवारी, ९ डिसेंबरला धाडसत्र राबवून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ४४ ठिकाणी छापेमारी केली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमध्ये १ , तर महाराष्ट्रात ४३ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पुणे २, ठाणे ग्रामीण ३१, ठाणे शहर ९ आणि भाईंदरमधील एका ठिकाणी छापेमारी केली.
In a massive crackdown on ISIS, the National Investigation Agency (NIA) today arrested 15 operatives of the banned terror outfit during multiple and widespread raids across Maharashtra and Karnataka. NIA teams swooped down on as many as 44 locations in Padgha-Borivali, Thane,… pic.twitter.com/m0AIPysh83
— ANI (@ANI) December 9, 2023
हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी…
एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, ISISवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करताना राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA)शनिवारी महाराष्ट्र आणि कर्नाटकात छापे टाकून दहशतवादी संघटनेच्या १५ जणांना अटक करण्यात आली. एनआयएच्या पथकांनी शनिवारी पहाटे महाराष्ट्रातील पडघा-बोरिवली, ठाणे, मीरारोड, पुणे आणि कर्नाटकातील बेंगळुरू येथे ४४ ठिकाणी धाड टाकली. दहशतवादी कृत्ये आणि दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या १५ आरोपींना अटक केली. यावेळी एनआयएकडून बेहिशेबी रोखरक्कम, बंदूक धारदार शस्त्रे, गुन्ह्यातील दस्तऐवज, स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. ISISच्या हिंसक कारवाया करण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी एनआयएने ही कारवाई केली.
Join Our WhatsApp Community