उरण येथील २० वर्षीय यशश्री शिंदे हिच्या हत्येची घटना ताजी असतानाच बुधवारी सायंकाळी सीवूड येथील तलावात १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.या तरुणीचा खून करून मृतदेह तलावात फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (Navi Mumbai Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलावात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी हा मृतदेह सर्वात प्रथम बघितला आणि पोलिसांना कळवले. हा मृतदेह नेरूळ येथील भाविका मोरे (Bhavika More) या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा असून, तिचे पनवेल येथील स्वस्तिक पाटील (Swastik Patil) या २२ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Navi Mumbai Crime)
प्रथमदर्शनी, मुलीचा गळा दाबून मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यांना हे दोघे दुपारी ४ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून तलावाकडे जाताना दिसून आले,परंतु मुलगा परत येताना आढळला नाही. (Navi Mumbai Crime)
त्यामुळे त्याने तरुणीचा गळा आवळून तलावात उडी मारल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. “तलाव खाडीला जोडलेला आहे आणि तरुणाचा मृतदेह खाडीत गेला असण्याची शक्यात वर्तवली जात आहे.मृतदेहाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच एनआरआय कोस्टल पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर झाले. (Navi Mumbai Crime)
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोघेही रिलेशनशिप मध्ये होते आणि या दोघांमध्ये भांडण झाले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे, मात्र नेमके कारण कळून येत नाही. मृत तरुणीला एक भाऊ आणि आई आहे तर वडिलांचे निधन झाले होते. आई आणि तिचा भाऊ राहण्यासाठी फोटो स्टुडिओ चालवत होते. स्वस्तिक पाटील हा पनवेलमध्ये मेडिकल स्टोअरमध्ये काम करीत होता आणि त्यांचे वडील बांधकाम करतात. (Navi Mumbai Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील आणि मोरे या दोघांच्याही कुटुंबीयांचा शोध घेऊन घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांना या दोघांच्या प्रेमसंबंधा बाबत माहिती नव्हती. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (Navi Mumbai Crime)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community