Navi Mumbai Drugs Case : ५.६२ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, २ नायजेरियन नागरिकांना अटक

27

नवी मुंबईत (Navi Mumbai) ड्रग्ज विक्री करणाऱ्या नायझेरियन व्यक्तीवर अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किमत ही अंदाजे ५.६२ कोटी रुपयांच्या घरात असून, दोन नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आले आहे. मिळलेल्या माहितीनुसार, ही औषधे देशाच्या विविध भागात पुरवली जाणार होती. एका पोलीस अधिकाऱ्याने अशी माहिती एका वृत्तसंस्थेला दिली. (Navi Mumbai Drugs Case)

(हेही वाचा – Balasaheb Thackeray यांच्या स्मृतीस्थळावर शिवसैनिकांची गर्दी)

दोघांना घरभाडे दिल्याप्रकरणी ३ जणांना अटक

पोलिसांनी सांगितले की, रविवारी नवी मुंबईत ५.६२ कोटी रुपयांचे ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी दोन नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली. त्याचवेळी या दोघांना त्यांचे निवासस्थान भाड्याने दिल्याप्रकरणी आणखी तिघांनाही अटक करण्यात आले आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे, अंमली पदार्थ (Narcotics) विरोधी पथकाने शनिवारी १६ नोव्हेंबर रोजी तळोजा येथील निवासी संकुलावर छापा टाकला, या छाप्यादरम्यान दोन नायजेरियन नागरिकांना (Nigerian citizen) कोकेन आणि मेफेड्रोनसह अटक करण्यात आले आहे. (Navi Mumbai Drugs Case)

(हेही वाचा – PM Modi यांचे आव्हान राहुल गांधींनीही अर्धवट स्वीकारले; बाळासाहेबांना ‘Hinduhridaysamrat’ बोलण्याची हिंमत केली नाही)

आरोपींविरुद्ध एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल

ओन्येका हिलरी इलोडिन्सो (२५) या आरोपीकडे २.४२ किलोग्रॅम मेफेड्रोन (Mephedrone) आणि १७४ ग्रॅम कोकेन (Cocaine) असल्याचा आरोप आहे. ज्याची किंमत ५.६२ कोटी रुपये होती. त्याच वेळी, दुसरा आरोपी चिडिबेरे क्रिस्टोफर मुओघलू (४०) हा पासपोर्ट आणि व्हिसाची मुदत संपल्यानंतरही देशात राहत होता. भारतीय न्याय संहिता, नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायदा, परदेशी नागरिक कायदा आणि परदेशी नागरिक नोंदणी कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोघांची चौकशी सुरू आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.