पैसे कमवण्याचा शॉर्टकट म्हणून प्रफुल्ल पाटील या नववी शिकलेल्या तरुणाने नवी मुंबईतील तळोजा येथे बनावट नोटांचा छापखाना काढला. सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून त्याने बनावट नोटांचा कारखाना सुरू केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Navi Mumbai)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल पाटील हा घरच्यांपासून वेगळा एकटा राहात होता. त्याला पैशांची चणचण भासत होती. त्या काळात त्याने सोशल मीडियावर बनावट नोटा तयार करण्याबाबत माहिती घेतली. या माहितीच्या आधारे नोटा बनवण्यासाठी कॉटन पेपर, प्रिंटर, स्कॅनर आणि नोटेवर चिकटवण्यासाठी हिरव्या रंगाची प्लास्टिकची पट्टी या साहित्यांची खरेदी केली. हे साहित्य वापरून प्रफुल्लने 10, 20, 50, 100 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या होत्या. (Navi Mumbai)
(हेही वाचा – IPL 2024, Playoff Scenerio : सनरायझर्स हैद्राबाद बाद फेरीत पोहोचणारा तिसरा संघ, आता चेन्नई, बंगळुरू आणि लखनौमध्ये स्पर्धा)
मागील दीड महिन्यात त्याने एक लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा वापरातदेखील आणल्या होत्या. त्याच्या मार्फत वापरात येणाऱ्या नोटा बनावट असल्याचा संशय काही नागरिकांना आल्याने त्यांनी पोलिसांना त्याबाबतची माहिती दिली.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून प्रफुल्ल पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता बनावट नोट बनविण्याचे साहित्य आणि 2 लाख 3 हजार किंमतीच्या बनावट नोटा आढळल्या. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात प्रफुल्ल पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community