भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला (Pakistan) पुरविल्याबद्दल महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) एका २३ वर्षांच्या तरुणाला अटक केली. गौरव पाटील असे त्या तरुणाचे नाव असल्याचे एटीएसने सांगितले आहे. हा तरूण नेव्हल डॉक येथे शिकाऊ उमेदवार म्हणून काम करत असल्याचे समोर आले.
एटीएसने चौकशी केल्यानंतर चौघांना अटक केली
एटीएसने अटक केलेला तरुण हा सोशल मीडियाद्वारे संपर्कात होता. एटीएसने एकूण चार लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतर तीन लोक गौरव पाटीलच्या संपर्कात होते, असेही दहशतवादी विरोधी पथकाने सांगितले आहे. गौरवने माहितीच्या बदल्यात ऑनलाईन पैसे स्विकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एप्रिल-मे ते ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानी गुप्तहेराच्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वर तो संपर्कात होता. एटीएसने चौकशी केल्यानंतर चौघांना अटक केली आहे. गौरव पाटील याला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गौरव मागील चार ते पाच महिन्यांपासून पाकिस्तानी गुप्तहेराच्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्कात होता.
(हेही वाचा Parliament Smoke Attack : आरोपींची आधी सोशल मीडियातून मैत्री; मग संसद घुसण्याची योजना रचली)
Join Our WhatsApp Community