Naxalite Attack: तेलंगणातील मुलुगु येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार

41

छत्तीसगड-तेलंगणा सीमा (Chhattisgarh-Telangana border) भागात सुरक्षा दलाच्या पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तेलंगणातील मुलुगु (Telangana Mulugu Naxalite Attack) येथे रविवारी सकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्यामध्ये सात नक्षलवादी ठार झाल्याची बातमी आहे. तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील एतुरागरामच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.  (Naxalite Attack)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला. तसेच, चकमकीनंतर पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. चालपाका जंगल परिसरात ही चकमक झाली. या चकमकीत मारल्या गेलेल्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या (Naxalite Attack) काही प्रमुख नेत्यांचाही समावेश असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

(हेही वाचा – Chinmoy Krishna Das यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीकडून घाटकोपर येथे आंदोलन!)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणा पोलिसांचे नक्षलविरोधी दल ग्रेहाऊंड्स आणि एतुरानगरमच्या जंगल (Forests of Ethuranagaram) परिसरात नक्षलवाद्यांमध्ये शोध मोहिमेदरम्यान ही घटना घडली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “चकमकीत सात माओवादी ठार झाले.” घटनास्थळावरून दोन एके ४७ रायफल (AK 47 rifle) जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मारले गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) च्या तेलंगणा राज्य समितीचे (येलांडू नरसंपेट) सचिव कुर्सम मंगू उर्फ ​​भद्रू (Secretary Kursi Manju alias Bhadra) यांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.