रविवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारच्या दरम्यान बालाघाटातील रुपझार पोलीस स्टेशनच्या सोनगुड्डा अंतर्गत कुंडुल जंगलात (Kundul Jungle) पोलीस शोध पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक (Naxalites Attack) झाली. या चकमकीत हवालदार शिवकुमार शर्मा जखमी झाला असून त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथे पाठविण्यात आले आहे. (Naxalites Attack) मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून रविवारी हॉक फोर्सच्या पथकांकडून (Hawk Force) माहितीच्या आधारे विशेष मोहीम राबविण्यात येत होती. विशेष मोहिमेदरम्यान कुंडुल हिल जंगल (Kundul Hill Forest) परिसरात पोलीस दलाच्या हॉक फोर्स एसओजीचे जवान गणवेशातील १२ ते १५ सशस्त्र नक्षलवाद्यांशी समोरासमोर आले.
पोलिसांनी दिले चोख प्रत्युत्तर पोलिसांना पाहताच नक्षलवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. सुरक्षा दलांनी जीवाची पर्वा न करता नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxalism and police attack) झालेल्या चकमकीत हॉक फोर्सचा हवालदार गंभीर जखमी झाला.
चकमकीला दुजोरा देताना पोलीस अधीक्षक नागेंद्र सिंह म्हणाले की, जखमी जवानावर चांगले उपचार केले जात आहेत आणि डॉक्टरांशीही चर्चा केली जात आहे, तसेच या अधिकाऱ्यांनी सांगितले की, १२ ते १५ नक्षलवाद्यांनी शोध घेणाऱ्या पार्टीवर अचानक हल्ला केला. जंगलात नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस दलांकडून शोध मोहिम सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.