नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) वर्षभरात केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेले ९८२ किलो अमली पदार्थ नवी मुंबईतील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड येथे नष्ट करण्यात आला आहे. यापूर्वी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथक तसेच सीमाशुल्क आणि डीआरआयने हजारो कोटींचा अमली पदार्थ नष्ट केला होता. मुंबईसह राज्यातील विविध भागात करण्यात आलेल्या कारवाईत एवढ्या मोठ्या प्रमाणात हा साठा जप्त करण्यात आला होता. या तपास यंत्रणांनी वर्षभरात एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करून देखील अमली पदार्थाची तस्करी थांबलेली नसून मुंबईसह राज्यात अमली पदार्थाचा बेकायदेशीर व्यापार अद्याप सुरू आहे.
(हेही वाचा – Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड आणि बारामुल्लामध्ये चकमक, 2 जवान हुतात्मा; 2 जखमी)
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या मुंबई झोनल युनिटनेने १७५ कोटी किमतीच्या अवैध अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली आहे, हे अमली पदार्थ चालू वर्षात आंतरराष्ट्रीय आणि आंतर-राज्य सिंडिकेट विरुद्ध केलेल्या ९५ ऑपरेशन्स दरम्यान जप्त करण्यात आले होते अशी माहिती एनसीबीचे अतिरिक्त संचालक (मुंबई), अमित घावटे यांनी दिली. विल्हेवाट लावलेल्या अंमली पदार्थांमध्ये २० किलोग्रॅम मेफेड्रोनचा समावेश असून जूनमध्ये डोंगरी येथून कार्यरत असलेल्या कथित सिंडिकेटवर कारवाई करताना जप्त करण्यात आला होता.
(हेही वाचा – BMC Hospital : नायर रुग्णालयातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचा आरोप : त्या सहयोगी प्राध्यापकाचे निलंबन)
नवी मुंबईतील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड या ठिकाणी एनसीबीने वेगवेगळ्या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या एकूण ९८२.१० किलो अमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले आहे. नष्ट करण्यात आलेल्या अमली पदार्थामध्ये गांजा, इफेड्रिन, कोडीन-आधारित कफ सिरप, नायट्राझेपम गोळ्या, हेरॉइन, कोकेन, एमडीएमए, एक्स्टसी गोळ्या, मेथाम्फेटामाइन, चरस, अफू, झोलपीडेम, अल्प्राझोलम आणि ट्रामाडोल या अमली पदार्थाचा समावेश आहे. गेल्या वर्षी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने २ हजार १०० किलो अमली पदार्थाची तळोजा येथील फॅक्टरीत विल्हेवाट लावली होती. दरम्यान सीमाशुल्क विभाग आणि डीआयआर ने काही महिन्यांपूर्वी केलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्हावाशेवा या ठिकाणी कारवाईत जप्त करण्यात आलेल्या हजारो कोटींचा अमली पदार्थ नष्ट केला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community