राष्ट्रवादीचे नेते सचिन कुर्मी (Sachin Kurmi) यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्यात आल्याचे मुंबई गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सोमवार, २ डिसेंबर रोजी सांगितले. आनंदा अशोक काळे उर्फ अन्या, विजय ज्ञानेश्वर काकडे उर्फ पप्या आणि प्रफुल्ल प्रवीण पाटकर असे कुर्मी हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. भायखळा पोलीस ठाणे सुरुवातीला दाखल झालेल्या हत्येचा तपास करीत होती, त्यानंतर हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. (Mumbai Police)
(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या चाणाक्ष अधिकाऱ्याने वाचवले १७ कोटी रुपये)
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ (MCOC) मधील तरतुदी या प्रकरणात लागू करण्यात आल्या आहेत”, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम १०३ (१), २३८ आणि ६१ (२) अन्वये, शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ४ आणि २५ आणि कलम ३७ आणि १३५ नुसार महाराष्ट्र पोलीस कायदा (MPA) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत तीन आरोपींना या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. (Mumbai Police)
(हेही वाचा – MHADA च्या घरांना मिळत नाही प्रतिसाद, आता घर विक्रीसाठी कॉर्पोरेट फंडा)
४ ऑक्टोबर रोजी भायखळा (Byculla) येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सचिन कुर्मी (Sachin Kurmi) (४३) यांच्यावर किमान तीन जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला होता, त्याच्या डोक्याला आणि पोटाला दुखापत झाली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे एका अधिकाऱ्याने आधी सांगितले होते. पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी सांगितले होते की, साक्षीदारांचे जबाब आणि घटनास्थळावरून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने मकोका लावल्यानंतर काही दिवसांनी कुर्मी हत्याकांडातील आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लावण्यात आला आहे. (Mumbai Police)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community