शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नीलिमा सावंत-चव्हाण यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. नीलिमा यांच्या जामिनावर बुधवारी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे समजते. सुधीर मोरे यांच्या मोबाईल फोन मधील कॉल रेकॉर्डिंग आणि कॉल डेटा रेकॉर्ड (सिडीआर) पोलिसांना मिळाले असून त्यात नीलिमा यांनी घटनेच्या दिवशी सुधीर मोरे यांना जवळपास २५ कॉल केल्याचे आढळून आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. नीलिमा आणि सुधीर मोरे यांच्यात एका महिलेवरून वाद सुरू होता अशी माहिती समोर येत आहे.
विक्रोळी पार्कसाईड येथे राहणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि रत्नागिरी जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी शुक्रवारी रात्री घाटकोपर आणि विद्याविहार दरम्यान ट्रेनखाली आत्महत्या केली होती. मोरे यांच्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मोरे यांचा मुलगा समर याने कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात नीलिमा सावंत- चव्हाण विरुद्ध तक्रार दाखल केली होती. नीलिमा आणि सुधीर मोरे यांच्यात मागील सात वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध होते, मागील काही महिन्यांपासून नीलिमाकडून सुधीर मोरे यांचा मानसिक छळ सुरू होता, त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले होते.
कुर्ला रेल्वे पोलिसांनी या तक्रारीवरून नीलिमा सावंत-चव्हाण हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. कुर्ला रेल्वे पोलिसांचे पथक नीलिमा यांच्या शोधासाठी दोन वेळा त्यांच्या राहत्या घरी गेल्या होत्या. मात्र, त्या मिळून आल्या नाही. तसेच त्यांचा मोबाईल फोन देखील बंद असल्यामुळे त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. नीलिमा सावंत-चव्हाण यांनी अटक टाळण्यासाठी मंगळवारी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असल्याचे समजते. या अर्जावर सत्र न्यायालयाने बुधवारी सुनावणी होणार आहे.
(हेही वाचा – First Fruit Village : साताऱ्यातील ‘या’ गावाला राज्यातील पहिल्या फळांच्या गावाचा बहुमान)
कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्याच्या तपास पथकाला सुधीर मोरे यांच्या मृतदेहाजवळ मिळून आलेला त्याचा मोबाईल फोन ताब्यात घेऊन मोबाईल तपसला असता त्यात नीलिमा सावंत-चव्हाण यांचे अनेक कॉल मिळून आले. घटनेच्या दिवशी नीलिमा यांनी जवळपास २५ कॉल केल्याचे समोर आले असून पोलिसांना मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग देखील मिळा़ल्या आहेत. या कॉल रेकॉर्डिंग वरून नीलिमा यांच्यावरील आरोप जवळजवळ सिद्ध होत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. नीलिमा आणि सुधीर मोरे यांच्यात सुरू असलेला वाद एका महिलेवरून सुरू होता. ही महिला वर्षभरा पासून मोरे यांच्या संपर्कात होती. कुर्ला रेल्वे पोलिसांनी या महिलेचा जबाब नोंदवून घेण्यासाठी तीला समन्स पाठवले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community