NEET पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या २ शिक्षकांसह चौघांवर गुन्हा दाखल

पेपर फोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करून तपास सीबीआय आणि ईडीकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

166
NEET पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या २ शिक्षकांसह चौघांवर गुन्हा दाखल
NEET पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या २ शिक्षकांसह चौघांवर गुन्हा दाखल

वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी घेण्यात येणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटीचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचले आहेत. पेपरफुटीप्रकरणी (NEET Exam Scam) लातूरमधील २ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील एका शिक्षकाला अटक करण्यात आली असून दुसरा शिक्षक फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

जलील पठाण असं अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचं नाव आहे, तर दुसरा शिक्षक संजय जाधव हा फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. ‘नीट’च्या निकालानंतर देशभरात सध्या गोंधळाचे वातावरण असून या परीक्षेत मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

पेपर फोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करून तपास सीबीआय आणि ईडीकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यानंतर बिहार, पंजाब, गुजरात आणि हरियाणा राज्यातील पेपरफुटी प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा सक्रीय झाली आहे. महाराष्ट्रातही एटीएसच्या पथकाने नीट परीक्षा घोटाळ्याचा तपास सुरू केला आहे.

(हेही वाचा – T20 World Cup, Eng vs USA : अमेरिकेला १० गडी राखून हरवत इंग्लडचा विजयाच्या दिशेनं पाऊल  )

दरम्यान, शनिवारी एटीएसच्या पथकाने लातूर येथील जिल्हा परिषदेच्या २ शिक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. दिवसभर कसून चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं, मात्र तपास यंत्रणांच्या हाती आलेल्या माहितीनुसार आरोपींच्या मोबाइलवर हॉलतिकिट आणि काही आर्थिक व्यवहारांचे संदर्भ आढळून आले. त्या माहितीच्या आधारे दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

नांदे आणि दिल्लीतील दोघांविरोधात गुन्हा दाखल
याशिवाय नांदे आणि दिल्ली येथील आणखी २ जणांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. या संशयित आरोपींकडून कोणती नवीन माहिती समोर येते याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पेपर फोडण्यासाठी २० ते ३० लाखांपर्यंतचा व्यवहार करण्यात आला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.