Nepal Plane Crash : नेपाळमध्ये विमानाचा टेक ऑफ करताना भीषण अपघात; १७ जणांचा मृत्यू झाल्याची भिती

204
Nepal Plane Crash : नेपाळमध्ये विमानाचा टेक ऑफ करताना भीषण अपघात; १७ जणांचा मृत्यू झाल्याची भिती
Nepal Plane Crash : नेपाळमध्ये विमानाचा टेक ऑफ करताना भीषण अपघात; १७ जणांचा मृत्यू झाल्याची भिती

काठमांडूच्या (Kathmandu) त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान टेक ऑफ करताना क्रॅश होऊन अपघात (Nepal Plane Crash) घडला आहे. यावेळी विमानात 19 प्रवासी होते. तर. आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. सौर्य एअरलाइनचं हे विमान आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

(हेही वाचा –Manoj Jarange यांच्याविरोधात अटक वॉरंट; काय आहे प्रकरण ?)

काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावर झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी मदत व बचतकार्य सुरू करण्यात आले आहे. बचावपथकाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. आग विझवण्यात आली आहे. तर, आत्तापर्यंत 17 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर, अन्य प्रवाशांचा शोध सुरू आहे. या अपघातातून पायलट बचावला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा येताच त्याच्याकडे अपघाताविषयी चौकशी करण्यात येणार आहे. (Nepal Plane Crash)

(हेही वाचा –India’s Tour of Sri Lanka : गौतम गंभीरचा पहिल्यांदाच भारतीय संघाबरोबर सराव, संजू सॅमसनला दिले फलंदाजीचे धडे )

द काठमांडू पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमान काठमांडूवरुन पोखरा येथे जात होते. टेक ऑफ करताना रनवेवरुन घसरल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सौर्य एअरलाइनचे विमान नंबर 9N-AME (CRJ 200)चा अपघात झाला आहे. अपघातानंतर विमानातून आगीचे लोट बाहेर पडत होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. (Nepal Plane Crash)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.