New Delhi Railway Station Stampede : ‘रेल्वेची ती एक सूचना आणि…’ ; हमालाने सांगितलं नेमकं काय घडलं?

138
New Delhi Railway Station Stampede : ‘रेल्वेची ती एक सूचना आणि...' ; हमालाने सांगितलं नेमकं काय घडलं?
New Delhi Railway Station Stampede : ‘रेल्वेची ती एक सूचना आणि...' ; हमालाने सांगितलं नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली (New Delhi) रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत (New Delhi Railway Station Stampede) 18 जणांचा मृत्यू झाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर शनिवारी (15 फेब्रुवारी) रात्री आठ ते साडे आठच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घटली. (New Delhi Railway Station Stampede)

हेही वाचा-New Delhi Railway Station Stampede: चेंगराचेंगरीतील मृतांच्या वारसांना १० लाख, तर जखमींना अडीच लाख देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

अफवा पसरल्यामुळे गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. ऐनवेळी प्रयागराज एक्स्प्रेसचा (Prayagraj Express) प्लॅटफॉर्म बदलल्याने गोंधळ उडाला आणि त्याचे पर्यावसान चेंगराचेंगरीत झाले. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका हमालाने चेंगराचेंगरीचा सगळा घटनाक्रम सांगितला. (New Delhi Railway Station Stampede)

“मी १९८१ पासून रेल्वेत हमाल म्हणून काम करतोय. मी अशी गर्दी यापूर्वी कधीच माझ्या आयुष्यात पाहिली नाही. प्रयागराजसाठी विशेष एक्स्प्रेस पाठवण्यात येत होती. त्या एक्स्प्रेसचा प्लॅटफॉर्म क्रमांक १२ बदलून प्लॅटफॉर्म क्रमांक १६ करण्यात आला. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर १२ वरील लोक प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वर आले.” (New Delhi Railway Station Stampede)

हेही वाचा-दैनंदिन वापरात इंधन बचत केल्यास शाश्वत विकास शक्य; Aditi Tatkare यांचे विधान

“प्लॅटफॉर्म क्रमांक १२ वरून लोक प्लॅटफॉर्म १६ वर जाऊ लागले. त्याचवेळी चालण्याचा जिना आणि सरकत्या जिनावर लोक पडायला लागले. आणि घटना घडली. आम्हाला (हमालांना) जेव्हा घटनेची माहिती मिळाली, तेव्हा आम्ही लोकांना रोखलं. रस्ता बंद केला आणि मृतदेह बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेत नेले.” (New Delhi Railway Station Stampede)

“१५ मृतदेह आम्ही स्वतः ठेवले. त्यानंतर पुढे माहिती नाही. लोक खाली दबले होते. आमची परिस्थिती इतकी बिकट झाली होती की मी जेवण सुद्धा केलं नाही, ती घटना बघून. तीन तास हमालांनी इतकी मदत केली की, तितकी पोलिसांनीही केली नाही.” अशी माहिती हमालाने दिली. (New Delhi Railway Station Stampede)

हेही वाचा-Moradabad मध्ये अल्पवयीन मुलगी बेपत्ता; कुटुंबियांनी दिलशादवर केला लव्ह जिहाद आणि अपहरणाचा आरोप

“आम्ही कॉल केला की गोंधळ झाला आहे, पोलीस पाठवा. पण, अग्निशामक दलाच्या तीन गाड्या आल्या. त्यांना वाटलं की, आग लागली आहे. त्यानंतर चार रुग्णवाहिका आल्या. एक-एक, दोन-दोन मृतदेह घेऊन रुग्णवाहिका गेल्या. ही घटना आम्ही बघितली.” असं हमालाने सांगितले. (New Delhi Railway Station Stampede)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.