New Delhi Railway Station Stampede: चेंगराचेंगरीतील मृतांच्या वारसांना १० लाख, तर जखमींना अडीच लाख देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

96
New Delhi Railway Station Stampede: चेंगराचेंगरीतील मृतांच्या वारसांना १० लाख, तर जखमींना अडीच लाख देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
New Delhi Railway Station Stampede: चेंगराचेंगरीतील मृतांच्या वारसांना १० लाख, तर जखमींना अडीच लाख देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (New Delhi) रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत (New Delhi Railway Station Stampede) 18 जणांचा मृत्यू झाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर शनिवारी (15 फेब्रुवारी) रात्री आठ ते साडे आठच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घटली. दिल्लीतूनही मोठ्या संख्येने लोक महाकुंभात (Mahakumbh) शाही स्नान करण्यासाठी जात आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून महाकुंभासाठी येथून दोन विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये चढण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी आले होते. (New Delhi Railway Station Stampede)

हेही वाचा-Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; प्रयागराजकडे जाणाऱ्या १८ भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू

प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला तर 20 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेतील मृतांच्या वारसांना आणि जखमींना केंद्र सरकारने (The central government) आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या वारसांना दहा लाख रुपये, तर जखमींना अडीच लाख, तर किरकोळ जखमींना एक लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. (New Delhi Railway Station Stampede)

हेही वाचा-Thane मध्ये संशयित बांगलादेशी मजुरांची पोलिसांकडून ओळख परेड

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांबद्दल दुःख व्यक्त केले. “दिल्ली रेल्वे स्थानकावरील दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे मी दुःखी आहे. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे, त्यांच्याप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. संपूर्ण टीम त्या व्यक्तींना मदत करण्यासाठी काम करत आहे.” असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. (New Delhi Railway Station Stampede)

मृत व्यक्तींची नावे (New Delhi Railway Station Stampede)
आहा देवी (वय ७९ वर्ष, बिहार)
पिंकी देवी (वय ४१ वर्ष, दिल्ली)
शीला देवी (वय ५० वर्ष, दिल्ली)
व्योम (वय २५ वर्ष, दिल्ली)
पूनम देवी (वय ४० वर्ष, बिहार)
ललिता देवी (वय ३५ वर्ष, बिहार)
सुरूची पुत्री (वय ११ वर्ष, बिहार)
कृष्णा देवी (वय ४० वर्ष, बिहार)
विजय साह (वय १५ वर्ष, बिहार)
नीरज (वय १२ वर्ष, बिहार)
शांती देवी (वय ४० वर्ष, बिहार)
पूजा कुमार (वय ८ वर्ष, बिहार)
संगीता मलिक (वय ३४ वर्ष, हरयाणा)
पूनम वीरेंद्र सिंह (वय ३४ वर्ष, दिल्ली)
ममता झा (वय ४० वर्ष, दिल्ली)
रिया सिंह (वय ७ वर्ष, दिल्ली)
बेबी कुमारी (वय २४ वर्ष, दिल्ली)
मनोज कुशवाह (वय ४७ वर्ष, दिल्ली)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.