New India Co-operative Bank : मुंबईतील ‘या’ बँकेवर RBI ने घातली बंदी ; आता ग्राहकांना पैसे काढता येणार नाही

306
NICB मध्ये १२२ कोटी रुपयांचा बँक घोटाळा ; बँकेच्या महाव्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल
NICB मध्ये १२२ कोटी रुपयांचा बँक घोटाळा ; बँकेच्या महाव्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) काल (13 फेब्रु. ) रात्री मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर (New India Co-operative Bank) नवीन कर्ज (Loan) वितरीत करण्यास आणि ठेवी काढण्यास सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. बँकेत अलीकडील काळात घडलेल्या काही घडामोडींमुळे ठेवीदारांच्या रक्षण करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. (New India Co-operative Bank)

दोन वर्षांपासून बँक तोट्यात
यानंतर शुक्रवारी (14 फेब्रु.) सकाळी बँकेच्या (New India Co-operative Bank) शाखेबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी जमल्याचे पाहायला मिळत आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर ग्राहकांनी त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी ही गर्दी केली आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक गेल्या दोन आर्थिक वर्षांत तोट्यात (Loss) आहे, मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला २२७.८ दशलक्ष रुपयांचा आणि २०२३ मध्ये ३०७.५ दशलक्ष रुपयांचा तोटा झाला आहे, असे बँकेचया वार्षिक अहवालात म्हटले आहे. याबाबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. (New India Co-operative Bank)

‘आरबीआय’कडून कोणते निर्बंध?
भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर लादलेल्या निर्बंधानुसार, बँकेचे ग्राहकही त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत. पीटीआयच्या वृत्तानुसार, बँकेच्या सध्याची स्थिती लक्षात घेता, रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांनाही रक्कम काढण्यावर निर्बंध घातले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे आरबीआयच्या आदेशानुसार पुढील ६ महिन्यांसाठी बँकेवर हे निर्बंध लागू असणार आहेत. (New India Co-operative Bank)

हेही वाचा-कॅन्सरच्या उपचारांवर CM Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

आरबीआयने म्हटले आहे की, या निर्देशांचा अर्थ बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आला आहे असे नाही. ते त्यांच्या स्थितीवर लक्ष ठेवतील आणि आवश्यकतेनुसार कारवाई करतील. (New India Co-operative Bank)

हेही वाचा- Mahakumbh 2025 मध्ये होणार तीन विश्वविक्रम ; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सची टीम पोहोचली

काही विशिष्ट अटी लागू करत आरबीआयने ग्राहकांना ठेवींद्वारे कर्ज फेडण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय, ही बँक आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार, भाडे आणि वीज बिल यासारख्या काही आवश्यक कामांवर देखील खर्च करू शकणार. आरबीआयच्या सूचनांनुसार, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक १४ फेब्रुवारीपासून पूर्व-मंजुरीशिवाय कोणतेही कर्ज किंवा आगाऊ रक्कम देता येणार नाही. याशिवाय, आजपासून ही बँक कोणत्याही ग्राहकांची ठेव स्वीकारणार नाही किंवा त्यांच्या खात्यातून पैसे काढणार नाही. पण, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व पात्र ठेवीदारांना त्यांच्या ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर ठेव विमा आणि पत हमी महामंडळाकडून ठेव विमा दाव्याची रक्कम मिळवता येणार आहे. (New India Co-operative Bank)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.