दादर पोलिस ठाण्यात न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेकडून (New India Co-operative Bank) १२२ कोटी रुपयांच्या अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचे महाव्यवस्थापक आणि लेखा प्रमुख हितेश मेहता यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून बँकेच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप आहे.
बँकेचे (New India Co-operative Bank) कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी शिशिर कुमार घोष (वय ४८) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, हितेश मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बँकेचा विश्वास भंग करून आणि बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव शाखांमधील तिजोरीतून निधी अपहार करून आर्थिक गुन्हा करण्याचा कट रचला. या प्रकरणी भारतीय दंड संहिता, २०२३ च्या कलम ३१६(५), ६१(२) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. हा पहिला गुन्हा १२ फेब्रुवारी २०२५ ला दाखल झाला. १५ फेब्रुवारी २०२५ ला दुसरा गुन्हा दाखल झाला.
(हेही वाचा Maharashtra Temperature : यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल; यंदाचा उन्हाळा किती कडक?
आरोपी हितेश मेहता याने त्याच्या सहकाऱ्यांसह फसवणूक करण्यासाठी एक गुन्हेगारी योजना आखली आणि बँकेच्या तिजोरीत सुरक्षित ठेवण्यासाठी सोपवण्यात आलेल्या तब्बल १२२ कोटी रुपयांचा गैरवापर केला. ही फसवणूक प्रभादेवी आणि गोरेगाव या दोन प्रमुख शाखांमध्ये झाली. आता हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे. प्रकरणाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक परिणाम लक्षात घेता, मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) तपास हाती घेतला आहे. अधिकारी आता या फसवणुकीची सखोल चौकशी करत आहेत, निधीच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहेत आणि घोटाळ्यात सहभागी असलेल्या इतर संभाव्य गुन्हेगारांची ओळख पटवत आहेत. (New India Co-operative Bank)
या अपहारा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच धाड सत्र झाले आहे. बँकेचे (New India Co-operative Bank) जनरल मॅनेजर हितेन मेहता याच्या दहिसर येथील घरावर आर्थिक गुन्हे शाखेची धाड टाकली. दहिसरच्या आर्यव्रत सोसायटीत आर्थिक गुन्हे शाखेची धाडसत्र कारवाई सुरु झाली. आर्थिक गुन्हे शाखेच्या छापा कारवाईनंतर हितेश मेहता यांना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात त्याची चौकशी सुरू झाली आहे. हितेश मेहता कोरोना काळापासून बँकेतून पैसे काढत होता. प्रभादेवी येथील बँकेच्या तिजोरीतून ११२ कोटी तर गोरेगाव शाखेतील तिजोरीतून १० कोटी रुपये गायब असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या पडताळणीत समोर आले होते.
Join Our WhatsApp Community