कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी तळोजा तुरुंगात असलेल्या ‘डीएचएफएल’ समूहाचे प्रवर्तक धीरज वाधवान आणि कपिल वाधवन या बंधूंनी वैद्यकीय चाचणीच्या नावाखाली वैद्यकीय सहल घडविणाऱ्या नवी मुंबई पोलीस दलातील एस्कॉर्ट टीमला नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी दणका दिला आहे. या एस्कॉर्ट टीममधील एका अधिकाऱ्यासह ७ जणांना नवी मुंबई पोलिसांनी निलंबित केले आहे.
कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले ‘डीएचएफएल’ समूहाचे प्रवर्तक धीरज वाधवान आणि कपिल वाधवान यांना सीबीआयने अटक केली आहे. हे दोघे सध्या नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात असून त्यांच्यावर न्यायालयात खटला सुरू आहे. कपिल आणि धीरज वाधवान हे वैद्यकीय चाचणीच्या नावाखाली प्रत्येक वेळी तळोजा तुरुंगातून बाहेर पडून आलिशान सुखसोयी उपभोगत असल्याचे नुकतेच एका वृत्तवाहिनीने समोर आणले होते. तळोजा तुरुंगातून मुंबईतील केईएम रुग्णालयात येत सर्व अलिशान सुखसोयी उपभोगत असल्याचे या वृत्त वाहिनेने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एस्कॉर्टिंग टीमने कोट्यवधींच्या घोटाळ्यात तुरुंगात असलेल्या वाधवान बंधूंना ९ ऑगस्ट आणि ७ ऑगस्ट रोजी मुंबईतील जे जे आणि केईएम रुग्णालयांच्या वैद्यकीय चाचणीच्या नावाखाली बाहेर काढून रुग्णालयाच्या आवारात वाधवान बंधूंच्या आलिशान गाडीत बसविण्यात आले. त्या ठिकाणी त्यांना जेवणाचा आनंद घेण्याची आणि मोबाइल फोन आणि लॅपटॉप वापरण्याची परवानगी दिली होती.
(हेही वाचा – V. N. Desai Hospital मध्ये आता कर्करोग, क्षयरोग विकाराचे होणार तात्काळ निदान)
हा व्हिडीओ या वृत्तवाहिनीवर प्रसारित होताच गृहखात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे या प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यानुसार काल रात्री उशिरा नवी मुंबई पोलीस दलातील ७ पोलिसांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक आशुतोष देशमुख, पोलीस हवालदार रवींद्र देवरे, विशाल दखने, पोलीस शिपाई प्रदीप लोखंडे, सागर देशमुख, माया बर्वे, प्राजक्ता पाटील अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community