नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसा कडून विविध ठिकाणावर लावण्यात आलेल्या नाकाबंदी तसेच वाहतूक पोलिसांच्या तपासणी दरम्यान मद्यपान करून वाहने चालविणे, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ३३३ तळीरामासह १७ हजार ८०० जणांवर ई चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करून ८९ लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (New Year Traffic Action)
थर्टी फर्स्टच्या रात्री मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मोटार वाहन चालकांविरूध्द कारवाई करण्याकरीता पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले. सदरची मोहिम ३१ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ सकाळपर्यंत आयोजित करण्यात आली. सदर माहिमे दरम्यान १०७ ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले व त्यात एकुण ४६,१४३ वाहने तपासण्यात आली. यात मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये एकुण ५६७० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली व मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या एकुण ३३३ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. याव्यतिरीक्त वाहतुक विभागाकडुन मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकुण १७,८०० वाहन चालकांवर ई-चलनद्वारे कारवाई करण्यात आली. (New Year Traffic Action)
या कारवाई दरम्यान वाहतूक पोलिसांनी ई चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करून ८९ लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरूध्द कारवाई करण्याकरीता भविष्यात यापुढेही विशेष मोहिम सतत राबविण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त यांनी म्हटले आहे. सदर विशेष मोहीमेच्या अनुषंगाने जनतेस याद्वारे आवाहन करण्यात येते की, वाहतुक नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक निदर्शनास आल्यास त्यांचे विरूध्द कारवाई करणेकरीता मुंबई पोलीस दलाच्या मुख्य नियंत्रण कक्ष येथील १००/१०३/११२ या क्रमांकांवर संपर्क साधण्यात यावा. (New Year Traffic Action)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community