कुख्यात खलिस्तानी दहशतवाद्याला एनआयएकडून अटक

151

देशविघातक कारवाया करणा-या खलिस्तानी दहशतवादी संघटनांविरोधात एनआयएला सोमवारी मोठे यश आले आहे. खलिस्तानी संघटनांशी संबंधित कुख्यात दहशतवाद्याला एनआयएने ताब्यात घेतले आहे. त्याला दिल्ली विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे.

खलिस्तानी संघटनांशी होता संबंध

कुलविंदरजीत सिंग उर्फ खानपुरिया या दहशतवाद्याला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि खलिस्तान लिबरेशन फोर्स या खलिस्तानी दहशतवादी संघटनांशी खानपुरिया याचे संबंध आहेत. 2019 पासून फरार असलेला कुलविंदरजीत हा अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये सहभागी होता. तसेच पंजाबातील अनेक हत्याकांडांमध्ये देखील त्याचा समावेश होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांकडून पाच लाख रुपयांचे इनामही जाहीर करण्यात आले होते.

(हेही वाचाः अंबरनाथ गोळीबार प्रकरण : फडके पितापुत्र, कृणाल पाटीलसह टोळीतील ३३ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई)

कुलविंदरजीत सिंग उर्फ खानपुरिया हा 18 नोव्हेंबरला बँकॉकहून दिल्लीत आला होता. यावेळी एनआयने सापळा रचून खानपुरिया याला ताब्यात घेतले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.