NIA Raid : अमरावतीतील विद्यार्थ्याचे ISIS कनेक्शन;एनआयएने छापा टाकून केली अटक

अमरावतीमध्ये एनआयएने छापेमारी केली आहे. अचलपूरमध्ये एनआयएने छापा टाकला असून .येथून एका संशयित विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.

216
NIA Raid : अमरावतीतील विद्यार्थ्याचे ISIS कनेक्शन;एनआयएने छापा टाकून केली अटक
NIA Raid : अमरावतीतील विद्यार्थ्याचे ISIS कनेक्शन;एनआयएने छापा टाकून केली अटक

एनआयएने महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. गेल्या आठवड्यात पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात छापे मारत एनआयएने काही जणांना ताब्यात घेतले होते.त्यांनतर आता दक्षिण भारतातील 19 ठिकाणांसह महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये देखील एनआयएने छापेमारी केली आहे. सोमवारी (१८ डिसेंबर) सकाळी अमरावती ग्रामीणच्या अचलपूरमध्ये एनआयएने  छापा टाकला आहे.येथून एका संशयित विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. (NIA Raid )

हा तरुण स्थानिक महाविद्यालायचा विद्यार्थी

अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये एनआयएचे पथक छापे टाकत असून एनआयएच्या एका पथकाने अचलपूर येथील
पथकाकडून त्याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. आधिक माहितीनुसार एनआयएने ताब्यात घेतलेला तरुण हा अचलपूर येथील स्थानिक महाविद्यालायचा विद्यार्थी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा विद्यार्थी सोशल मिडियातून विशेषतः व्हॉटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून जिहादी संघटनांच्या संपर्कात होता. (NIA Raid )

(हेही वाचा : Parliament Security: संसदेत घुसखोरी करणाऱ्या सागर शर्माचा कुटुंबियाशी संवाद, व्हिडियो कॉलवर काय बोलला? वाचा सविस्तर…)

हा विद्यार्थी ईसीस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात
हा विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याच्या संशयावरून एनआयएच्या पथकाने सोमवारी (१८डिसेंबर) पहाटे चार वाजता स्थानिक एटीएस आणि जिल्हा पोलिसांच्या पथकासह अचलपुरला दाखल झाले. अचलपुरच्या अकबरी चौक बियाबानी गली येथून एनआयएच्या पथकाने या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. एनआयएचे पथक १५ वाहनांच्या ताफ्यासह बियाबनी गली यथे पोहोचले होते अशी माहिती मिळाली. या विद्यार्थ्याला सिरियामधील हॅन्डल कडून संदेश मिळाले होते अशी माहिती एनआयएला मिळाली होती. हा विद्यार्थी ईसीस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यानुसार एनआयएने हे छापे टाकले होते. (NIA Raid )

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.