- मुंबई-संतोष वाघ
इसिस संबंधी पडघा-बोरिवलीत छापेमारी नंतर राष्ट्रीय तपास संस्थेने देशातील चार राज्यात सर्वात मोठ्या प्रमाणात छापेमारी केली आहे. या चार राज्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि अमरावती या तीन ठिकाणचा समावेश आहे. या छापेमारीत एनआयए (NIA) आणि स्थानिक तपास यंत्रणांनी आठ जणांना अटक करून इसिसचे बल्लारी मॉड्युल उध्वस्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आठ जणांमध्ये बल्लारी मॉड्युलचा मुख्य नेता मिनाझ उर्फ मो. सुलेमान याचा समावेश आहे. (NIA)
एनआयए (NIA) या छापेमारीत मोठ्या प्रमाणात सल्फर, पोटॅशियम नायट्रेट, चारकोल, गनपावडर, साखर आणि इथेनॉल यांसारखा स्फोटक कच्चा माल, धारदार शस्त्रे, बेहिशेबी रोकड आणि गुन्हेगारी कागदपत्रे, स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहे. एनआयएने (NIA) दिलेल्या माहिती नुसार या बल्लारी मॉड्युलने देशात मोठ्या प्रमाणात ‘IED’ स्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता अशी धक्कादायक माहिती या छाप्यादरम्यान समोर आली आहे. (NIA)
एनआयएच्या (NIA) विविध पथकांनी सोमवारी पहाटेपासून स्थानिक तपास यंत्रणांच्या मदतीने कर्नाटकातील बल्लारी आणि बेंगळुरू, महाराष्ट्रातील अमरावती, मुंबई आणि पुणे झारखंडमधील जमशेदपूर आणि बोकारो आणि दिल्ली असे एकूण १९ ठिकाणी छापेमारी करून ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (इसिस)चे बल्लारी मॉड्युलचा पर्दाफाश केला. या छापेमारीत एनआयएने मिनाज उर्फ मोहम्मद सुलेमान आणि सय्यद समीर यांना बल्लारी येथून, अनस इक्बाल शेख मुंबईतून, मोहम्मद मुनिरुद्दीन, सय्यद समीउल्ला उर्फ सामी, बेंगळुरूमधून मोहम्मद मुझम्मिल, दिल्लीतून शायान रहमान उर्फ हुसेन आणि मो. शाहबाज उर्फ झुल्फीकार उर्फ गुड्डू यांना जमशेदपूर येथून अटक करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार, अटक करण्यात आलेले संशयित दहशतवादी यांच्याकडून जप्त करण्यात आलेले स्फोटकाचा कच्चा माल आयईडी स्फोटके तयार करण्याची योजना आखून देशात त्याचा स्फोट घडवून आणण्याचा कट आखण्यात आला होता. (NIA)
(हेही वाचा – Corona virus JN 1: नव्या व्हेरिअंटमुळे पाच जणांचा मृत्यू ; केंद्राने जारी केली अॅडव्हायजरी)
महाविद्यालयीन विद्यार्थी लक्ष्य …
इसिसच्या बल्लारी मॉड्युलच्या लक्षावर महाविद्यालयातील विद्यार्थी होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इसिसमध्ये भरती केली जात होते. हिंसक जिहाद, खिलाफत, इसिसकच्या इत्यादी मार्गाचा अवलंब करून अटक करण्यात आलेले संशयित एनक्रिप्टेड अॅप्सद्वारे सतत एकमेकांच्या संपर्कात होते, असे तपासात पुढे आले आहे. इसिसमध्ये भरतीच्या उद्देशाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात होते आणि जिहादच्या उद्देशाने मुजाहिदीनच्या भरतीशी संबंधित कागदपत्रे देखील प्रसारित करत होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. (NIA)
एनआयएने (NIA) १४ डिसेंबर २०२३ रोजी इसिस प्रेरित बल्लारी मॉड्युल विरुद्ध गुन्हा नोंदवला होता. तेव्हापासून ते या मॉड्यूलच्या सदस्यांचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी राज्य पोलिस आणि केंद्रीय एजन्सीं सोबत मिळुन काम करीत असल्याची माहिती एनआयएने (NIA) दिली आहे. सोमवारी टाकण्यात आलेले छापे हे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) भारताविरुद्धच्या दहशतवाद विरोधी कटाचा नाश करण्याचा एनआयएच्या (NIA) प्रयत्नांचा एक भाग होता. कर्नाटक पोलीस, महाराष्ट्र पोलीस, झारखंड पोलीस आणि दिल्ली पोलीस यांच्या समन्वयातून आणि ऑपरेशनल सहाय्याने शोध घेण्यात आला असल्याचे एनआयएने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. (NIA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community