अमरावती (Amravati) शहरातील छाया नगर परिसरातून एनआयच्या टीमने (NIA Raid) एका 27 वर्षे युवकाला रात्री उशिरा ताब्यात घेतलं आहे. राजापेठ पोलीस ठाण्यात या युवकाची NIAकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा युवक पाकिस्तानमधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा समोर आलं आहे. NIA टीमने अमरावती शहरासह 17 ठिकाणी छापे टाकले असून अनेकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. (NIA Raid)
हेही वाचा-Anganewadi Jatra 2025 : आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली !
अमरावती शहरातील छाया नगर मधून NIA ने ताब्यात घेतलेल्या युवकाचं नाव मुसाईद असून त्याचं वय 35 वर्ष आहे. अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये या युवकाची सध्या चौकशी सुरू आहे. हा तरुण पाकिस्तानमधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा एनआयएला संशय आहे. या तरुणासंदर्भात अधिक चौकशी सुरू आहे. (NIA Raid)
हेही वाचा-Rajasthan News : बोअरवेलमध्ये अडकल्याने ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू !
तरुण पाकिस्तानी संघटनेच्या कसा संपर्कात आला? अमरावती किंवा भारतात त्यांच्यासोबत कोण आहे? तो कोणत्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला का? याबाबत चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडून करण्यात येत आहे. अमरावतीप्रमाणे एनआयएची टीम भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार ग्रामपंचायत परिसरात पोहचली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकाने एकास ताब्यात घेतले आहे. कामरान अन्सारी (45) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. (NIA Raid)
हेही वाचा-रेल्वेत होणार ५८,६४२ जांगासाठी भरती! मंत्री Ashwini Vaishnaw यांची माहिती
भिवंडीत (Bhiwandi) वर्षभरात एनआयएने केलेली ही तिसरी कारवाई आहे. भिवंडीत यापूर्वी एनआयएने छापे टाकले होते. मागील वर्षी डिसेंबर महिन्यातच भिवंडीच्या पडघा गावात एनआयएने मोठी कारवाई केली होती. या ठिकाणावर 7 ते 8 जणांना ताब्यात घेतले होते. पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना अटक करण्यात आली होती. (NIA Raid)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community