नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी (NIA) यांच्या वतीने बुधवारी ( १३ डिसेंबर) बेंगळुरू (Banglore) मध्ये दहशतवादी कट रचत असल्याच्या संशयावरून पाच पेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. काही गुप्त यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्य पोलीस दल आणि एनआयए यांनी एकत्रितपणे ही कारवाई केली आहे. ( NIA Raid)
दहशतवादी संबंध असलेल्या आणि त्यांच्या विदेशी हस्तकांच्या इशाऱ्यावर कार्यरत असलेल्या संशियितांच्या घरांवर छापे टाकण्याच्या कामाला सकाळ पासूनच सुरुवात झाली आहे. तर ज्या संशयितांना ताब्यात घेतले आहे अशांचा विविध दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची माहिती मिळाल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. चार दिवसांपूर्वीच NIA ने इसिस वर मोठी कारवाई करत महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटका (Karnataka) येथून दहशतवादी संघटनेच्या १५ कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर काही दिवसातच ही कारवाई केली आहे.
(हेही वाचा : Attack On Indian Consulate : भारतीय दूतावासावरील हल्ल्याची अमेरिका आक्रमकपणे तपास करणार ; लवकरच होणार खुलासा)
या प्रकरणात एनआयएच्या पथकांनी महाराष्ट्रातील पडघा-बोरिवली, ठाणे,मीरा रोड, पुणे,आणि कर्नाटकातील बेंगळुरू इस्लमिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया च्या दहशतवादाशी संबंधित प्रयत्न हाणून पाडण्यासाठी एनआयएने मोठ्या प्रमाणावर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. तर या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात धारधार शस्त्रे , रोकड तसेच डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.NIA ने काहीच महिन्यात दहशतवादी संबंधित ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत. आणि ISIS च्या दहशतवादी कट प्रकरणात अनेक दहशतवादी कार्यकर्त्यांना अटक करून वेगवेगळ्या ISIS मॉड्यूल्सचा पर्दाफाश केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community