भारताला इस्लामिक राजवट बनवण्यासाठी कारवाया करणाऱ्या हिज्ब-उत-तहरीर (Hizb-ut-Tahrir) या संघटनेच्या विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) (NIA) मोहिम हाती घेतली आहे. याअंतर्गत एनआयएने मंगळवारी तामिळनाडूत (Tamilnadu) 11 ठिकाणी छापेमारी केली. हिज्ब-उत-तहरीर या संघटनेवर अनेक ठिकाणी प्रतिबंध लावण्यात आलाय. देशविरोधी कारवायांमध्ये संलिप्त असलेल्या या संघटनेच्या विरोधात तरुणांचे ब्रेनवॉश केल्याबद्दल चेन्नई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले.
मध्य प्रदेशात हिज्ब-उत-तहरीर संघटनेशी संबंधित 16 जणांना अटक
चेन्नई सेंट्रल क्राईम ब्रँचच्या म्हणण्यानुसार, रोयापेट्टा येथील पिता-पुत्र आणि त्यांच्या साथीदारांनी हिज्ब-उत-तहरीर संघटनेत सहभागी होण्यासाठी लोकांचे ब्रेनवॉश केले होते. गुन्हे शाखेने दहशतवादाशी संबंधित प्रकरण एनआयएकडे सोपवले आहे. यापूर्वी अशाच एका प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काही आरोपींचीही चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान काही माहिती मिळाल्यानंतरच एनआयएने पुदुकोट्टई, कन्याकुमारी आणि तांबरमसह 11 ठिकाणी कारवाई सुरू केली. यापूर्वी मध्य प्रदेशात हिज्ब-उत-तहरीर संघटनेशी संबंधित 16 जणांना अटक करण्यात आली होती. यातील निम्मे असे होते जे धर्मांतरानंतर मुस्लिम बनले होते. (Tamilnadu)
इस्लामिक राष्ट्र निर्माण करणे हे या कट्टरवादी संघटनेचे उद्दिष्ट
हिज्ब-उत-तहरीर संघटनेची स्थापना 1952 मध्ये जेरुसलेममध्ये स्थापन झाली. त्याचे सध्याचे मुख्यालय लंडन येथे आहे. इस्लामिक राष्ट्र निर्माण करणे हे या कट्टरवादी संघटनेचे उद्दिष्ट आहे. त्याची एक वेबसाइट देखील आहे ज्यामध्ये अल्लाहवर विश्वास न ठेवणारी व्यवस्था रद्द करावी लागेल असे म्हटले आहे. हिज्ब-उत-तहरीर भडकाऊ भाषणे करून तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. तरुणांना जिहादसाठी तयार करण्यासोबतच त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही दिले जाते. अगदी जैविक शस्त्रे बनवण्याचे देखील प्रशिक्षण देतात. तसेच हिज्ब-उत-तहरीरचा धर्मांतरातही सहभाग आहे. याशिवाय लव्ह जिहादच्या घटनांमध्येही त्याचा हात असल्याचे समोर आले आहे. (Tamilnadu)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community