श्रीराम मंदिरासाठी शीळा आणलेल्या मार्गावरून PFIच्या ८ संशयितांना अटक

194

अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. दोन शालिग्राम शीळाही नेपाळहून अयोध्येला पोहोचली आहे. शीळा पूजन केल्यानंतर श्रीराम मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आली. दरम्यान, राम मंदिर उडवण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. श्रीराम मंदिर उडवण्याच्या कटाच्या दरम्यान, एनआयएने शनिवारी, ४ फेब्रुवारी २०२३ रोजी बिहारमध्ये छापा टाकला आणि ८ संशयितांना अटक केली. हे संशयित प्रतिबंधित अतिरेकी इस्लामिक संघटना पीएफआयशी संबंधित आहेत. रियाझ मारूफ यालाही अटक करण्यात आली आहे. मात्र, दोन जणांना ताब्यात घेतल्याची चर्चा अधिकारी करत आहेत.

एनआयएच्या छाप्यात कशी केली कारवाई?

एनआयएच्या पथकाने मोतिहारी येथील चकिया पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कुआनवा गावात हा छापा टाकून या संशयितांना अटक केली. हे ठिकाण तेच आहे, जेथून शालिग्राम शीळा नेपाळहून अयोध्येच्या मार्गाहून येताना या भागातून आली. फुलवारी शरीफ येथे पीएफआयचे प्रशिक्षण केंद्र चालवताना रियाझचे नाव गेल्या वर्षी समोर आले होते. त्यादरम्यान एनआयएनेही या गावात छापा टाकला होता, मात्र त्याआधीच रियाझ फरार झाला होता. PFI ने 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा अजेंडा सेट केला आहे. त्याची टूलकिट गेल्या वर्षी पाटणा येथील फुलवारी शरीफ येथे छापा टाकल्यानंतर समोर आली होती. यामध्ये अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या जागी पुन्हा मशीद बांधण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

(हेही वाचा भाजपकडून मुक्ता टिळकांच्या कुटुंबाला संधी नाही; चिंचवडमधून लक्ष्मण जगतापांच्या पत्नीला उमेदवारी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.