राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बेंगळुरू रामेश्वरम कॅफे IED स्फोट प्रकरणी (Rameshwaram Cafe Blast) एका प्रमुख संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. शब्बीर असे त्या संशयिताचे नाव आहे. या संशयिताला कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला तोच माणूस आहे की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.
१० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले
तपासकर्ते संशयिताची ओळख पडताळत आहेत. बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी (Rameshwaram Cafe Blast) बॉम्ब ठेवणाऱ्याची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीयता राखली जाईल, असेही तपास यंत्रणेने म्हटले होते. एजन्सीने रामेश्वरम कॅफेमध्ये बॅग ठेवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमधून बॉम्ब ठेवणाऱ्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले. या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रात बॉम्ब ठेवणारा आरोपी टोपी, काळी पँट आणि काळे शूज घातलेला दिसत होता.
Join Our WhatsApp Community