Nigerian Gang : मुंबई, नवी मुंबईतून कोट्यवधींच्या ड्रग्जसह नायजेरियन टोळ्यांना अटक

185
Nigerian Gang : मुंबई, नवी मुंबईतून कोट्यावधींच्या ड्रग्ससह नायजेरियन टोळ्यांना अटक
Nigerian Gang : मुंबई, नवी मुंबईतून कोट्यावधींच्या ड्रग्ससह नायजेरियन टोळ्यांना अटक

मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्यात ड्रग्सचा (अंमली पदार्थ) व्यापार करणाऱ्या नायजेरियन टोळ्यांचा सुळसुळाट झाला आहे. या नायजेरियन ड्रग्ज माफियांची मजल पोलिसांवर हल्ल्या करण्यापर्यंत गेली आहे. नवी मुंबईतील खारघर मध्ये कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर या नायजेरियन ड्रग्ज माफियांनी हल्ला केल्याची घटना गुरुवार, २७ जुलै रोजी समोर आली आहे. मात्र पोलिसांनी त्यांना चांगलाच इंगा दाखवत चार नायजेरियन ड्रग्ज माफियांना सव्वा कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांसह मुसक्या आवळल्या. दरम्यान, मुंबईतील माहीम रेल्वे स्थानकाच्या बाहेर तीन नायजेरियन आणि टांझानिया देशाच्या नागरिकांना ७८ लाख रुपये किमतीच्या अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली आहे.

खारघर सेक्टर १२, प्लॉट नंबर ८१ येथील एका घरात नायजेरियन महिला आणि पुरुष बेकायदेशीररित्या राहत होते. व त्या ठिकाणी ते अंमली पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे खारघर पोलिसांनी एक पथक तयार करून बुधवारी त्या ठिकाणी छापा टाकला असता  एक नायजेरियन महिला आणि तीन पुरुष राहत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यातील एका नायजेरिन नागरिकाने पोलिसावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु अगोदरच सावध असलेल्या पोलीस पथकाने हल्ला परतावून लावत महिलेसह चौघांच्या मुसक्या आवळत ताब्यात घेण्यात आले.

पोलीस पथकाने घराची झडती घेतली असता घरात मेथाक्युलोन हा अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात मिळाला. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत एक कोटी २९ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता हे चौघे बेकायदेशीरपणे या ठिकाणी वास्तव्यास होते. याप्रकरणी चौघांना अटक करून त्यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, अंमली पदार्थ बाळगणे व त्याची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इक्बुलेम बेनेजमीन सुडेय, सिबाना जोनाथन बेनि, इम्माकिवेल्ला क्टोल्ड आणि फव्होर जेरोर्ज असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहे. दरम्यान मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने माहीम रेल्वे स्थानकाबाहेर आणि डोंगरी येथे केलेल्या कारवाईत ७८ लाख रुपयांच्या कोकेन आणि एमडी या अंमली पदार्थांसह दोन टांझानिया आणि एक नायजेरियन नागरिक असे एकूण तिघांना अटक केली आहे. मागील सहा महिन्यांत मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने १५ नायजेरियन नागरिकांसह १३२ जणांना अटक केली असून सुमारे २८ कोटी ११ लाख रुपयाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Food and Drug Administration : अन्न व औषध प्रशासनावर औषध विक्रेत्यांचा गंभीर आरोप)

नायजेरीन टोळ्या ड्रग्स व्यवसायात…..

मुंबईसह राज्यभरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन केले जात आहे. महाविद्यालयीन तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकले जात आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे संभाजी नगर येथून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या कॉलेज तरुणांच्या एका रेव्ह पार्टीचा व्हिडीओ समोर आला आणि संपूर्ण राज्यात या व्हिडीओने खळबळ उडवून दिली होती. या व्हायरल व्हिडीओ नंतर पोलीस यंत्रणेने याची गंभीर दखल घेत संभाजी नगर पोलिसांनी ड्रग्स माफियांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे.

महाराष्ट्रात येणारा अंमली पदार्थांच्या व्यापारात नायजेरियन, टांझानिया या देशाचे नागरिक मोठ्या प्रमाणात गुंतले आहे. शिक्षणाच्या किंवा पर्यटनाच्या नावाखाली भारतात आल्यानंतर आपली मूळ कागदपत्रे जाळून नष्ट करतात आणि कागदपत्रे गहाळ झाल्याची तक्रार दाखल करून शहरांमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करून ड्रग्सचा धंदा करतात असे आता पर्यंतच्या पोलीस तपासात समोर आले आहे. अंमली पदार्थांचा व्यवसाय करणारे नायजेरियन हे झुंडीने एकत्र राहून त्यांच्या विरोधात अथवा त्यांना विरोध करणाऱ्यांवर झुंडीने हल्ला करीत असल्याच्या काही घटना समोर आलेल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.